22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसोलापूरनरभक्षक बिबटयाला गोळया घालण्याची वनविभागाने मागितली परवानगी

नरभक्षक बिबटयाला गोळया घालण्याची वनविभागाने मागितली परवानगी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : नरभक्षक बिबटया करमाळयात अंजनडोह परिसरात आला आहे. आता तो दक्षिणकडे सात ते दहा किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभुमीवर आ. संजय शिंदे यांच्या माध्यमातून वनविभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान बिबटयाला पकडण्यासाठी वनविभागाने स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

नरभक्षक बिबटया बीड नगर जिल्ह्यात हल्ले करून करमाळया पोहोचला आहे. बिबटयाने केलेल्या पहिल्या हल्ल्यात ३ डिसेंबर रोजी लिमयेवाडी (ता. करमाळा) येथील ४० वर्षीय कल्याण देवीदास कूंदे यांचा मृत्यू झाला तर ५ डिसेंबरला दुस-या हल्ल्यात अंजनडोह येथील जयश्री दयानंद शिंदे या २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बिबटयाचे हल्ले वाढू लागल्याने बिबटयाला गोळया घालून ठार करा अशी मागणी संजय शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार गोळया घालून बिबटयाला ठार करण्यास परवानगी द्यावी असे पत्र सोलापूर वनविभागाने नागपूर वनपरिक्षेत्र कार्यालयास पाठविले आहे. तुर्तास बिबटयाला बेशुध्द करण्यासाठी गनची व्यवस्था केल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी सांगितले.

देवणी गोवंश जतन करण्यासाठी आमदार धिरज देशमुख यांचे प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या