37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeसोलापूरसरकारने मराठ्यांच्या शांततेचा अंत पाहू नये-प्रिया नागणे

सरकारने मराठ्यांच्या शांततेचा अंत पाहू नये-प्रिया नागणे

एकमत ऑनलाईन

अकलूज, दि. १९ – सरकारने मराठ्यांच्या शांततेचा अंत पाहु नये. इथुन पुढचे मोर्चे शांततेत निघणार नाहीत. आमच्या हक्कांसाठी कसे लढायचे ते आम्हाला ठाऊक असल्याचे प्रतिपादन प्रिया नागणे यांनी केले. शंकरनगर-अकलूज येथे सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

सोमवार दि. २१ सप्टेबर रोजी सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर बंदची हाक दिली आहे. याविषयी विचार विनिमय करण्याकरीता महर्षिनगर-शंकरनगर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रिया नागणे पुढे म्हणाल्या, सामाजिक, शैक्षणीक व आर्थिक अडचणीत असलेल्या मराठा समाजाच्या भविष्याचा प्रश्न आज निर्माण झाला आहे. आणि आरक्षण हाच या अडचणींवरचा उपाय आहे. इतर राज्ये जर ५० टक्क्यांच्या पुढे आरक्षण देऊ शकत असतील तर महाराष्ट्र शासन का देऊ शकत नाही.

धनाजी साखळकर म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाचा आम्ही मराठा समाजाच्या वतीने जाहिर निषेध करत आहोत. आता सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवून द्यायची वेळ आली आहे. नानासाहेब भोरकड म्हणाले, मराठा समाजा विषयी सरकारमध्ये अनास्था दिसून येत आहे. शासनाने समाजासाठी निर्माण केलेली सारथी संस्था हेतुपूरस्सर मोडकळीस आणली आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळ आज सक्षम राहिले नाही. सरकारची इच्छाशक्ती कमजोर असल्याचेच हे चिन्ह आहे.

यावेळी जि. प. सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील, सुजयसिंह माने-पाटील, उत्तमराव माने-शेंडगे, निनाद पाटील, श्रीनिवास कदम-पाटील, बबनराव शेंडगे, अमर इंगवले-देशमुख, अॅड. नागेश काकडे रांजेंद्र मिसाळ उदय कदय उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या