18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeसोलापूरअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

एकमत ऑनलाईन

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत. तसेच बऱ्याच नागरिकांच्या घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अनेक रस्ते व सार्वजनिक मालमत्तांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासाठी मी स्वत तालुक्यातील सर्व प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो असून या संकट काळामध्ये ज्यांचे नुकसान झाले आहे .अशा सर्वांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी महुद येथे दिली.

काल सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शिवणे, वाकि, महुद, महिम ,चिक-महूद, कटफळ ,खवासपुर, चिनके, बलवडी ,नागरे ,वझरे , वाटंबरे या गावांच्या पाहणीसाठी शासकीय दौरा आमदार शहाजीबापू पाटील यांनी आयोजित केला होता .यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या झालेल्या नुकसानीची माहिती आमदार शहाजीबापू पाटील व शासकीय अधिकाऱ्यांना दिली.

यावेळी सांगोल्याचे तहसीलदार योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी संतोष राऊत ,तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, महावितरण उप अभियंता आनंद पवार, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता अशोक कंटीकर, सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी हजर होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांची बारकाईने वस्तुस्थिती नुसार पंचनामे करण्याच्या सूचना देऊन नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी शासकीय मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले .

यावेळी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, राजेंद्र मेटकरी ,रूपाली दादासाहेब लवटे, जिल्हा परिषद सदस्य गोविंद जरे ,संजय मेटकरी, लक्ष्‍मण भोसले, विजय शिंदे, पांडुरंग मिसाळ, दिलीप नागणे, अरुण नागणे, दादासो वाघमोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या