Sunday, September 24, 2023

अपघातामुळे पालकमंत्र्यांचा ताफा थांबला, जखमींना रुग्णालयात पाठवले

सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आज सोलापूर आणि बार्शी दौºयावर आहेत. इंदापूर या मूळ गावावरून सोलापूरकडे त्यांचा ताफा जात असताना वाटेत अपघात झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी तत्काळ तत्परता दाखव पालकमंत्र्यांनी आपल्या गाडीतून उतरून जखमींना मदत केली.

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री सोलापूर दौºयावर आहेत. इंदापूर येथून पालकमंत्री भरणे सोलापूरच्या दिशेने निघाले असता पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर अपघात झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी तात्काळ भरणे यांनी गाडीतून उतरत संबंधित अपघातातील जखमींची विचारपूस केली. तसेच जखमींना खासगी गाडीने रुग्णालयात पाठविण्यात आले. यासंदर्भात संबंधित डॉक्टरांनाही फोनवरून सूचना दिल्या.

सोलापूर शिथिल, बार्शी लॉकडाऊन
सोलापूर शहरात आजपासून लॉकडाऊनला शिथिलता देण्यात आली असून बार्शी तालुक्यात ३१ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सोलापुरात लागू केलेल्या लॉकडाऊनचा किती परिणाम झाला ते आपल्याला आणखी आठ ते दहा दिवसांनी कळेल. तुम्हाला निश्चितच फरक पडलेला दिसेल.

Read More  चारठाणा परिसरातील बंधारे ओव्हरफ्लो

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या