29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रार्दुभाव वाढला

सोलापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रार्दुभाव वाढला

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात लम्पी या संसर्गजन्य आजाराने बाधित असलेल्या सात जनावरांचा मृत्यू झाला असून सध्या १११ बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालकांत चिंतेचे वातावरण आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मृत सात जनावरांमध्ये चार बैल तर तीन गायींचा समावेश आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील महूद (एक) शिवणी (एक), उत्तर तालुक्यातील कवठे (एक), देगाव (एक), माढा तालुक्यातील ढवळस (एक), माळशिरस तालुक्यातील तिरखंडी (एक), पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी (एक) अशा सात मृत जनावरांचा समावेश आहे.

माळशिरस तालुक्यात या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. येथे ५६ जनावरांना लम्पी झाला असून उपचार सुरू आहेत. सांगोला (११), माढा (आठ), बार्शी (एक), पंढरपूर (पाच), उत्तर सोलापूर (२९) जनावरांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात ८७ हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे. तर दोन लाख २६ हजार लस पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध आहे.

सोलापूर जिल्ह्यात लम्पी या आजाराचा संसर्ग जनावरांमध्ये वाढत असल्याने लस, औषधे तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी म्हणून शासनाने जिल्हा नियोजनातून एक कोटी रुपये निधी रक्कम मंजूर केला आहे. तर जिल्हा परिषदेच्या सेसमधूनही ७६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या