22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरमोहोळच्या क्वारंटाईन सेंटरमधील जेवणात आढळल्या आळ्या

मोहोळच्या क्वारंटाईन सेंटरमधील जेवणात आढळल्या आळ्या

एकमत ऑनलाईन

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील गरड महाविद्यालयात क्वारंटाईनसाठी ठेवण्यात आलेल्या रुग्णांच्या जेवणात अळ्याआढळल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी २८ जुलै रोजी या क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना दिलेल्या जेवणामध्ये आळ्या, आढळल्याची तक्रार करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी तात्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. क्वारंटाईन सेंटर मधील लोकांना सार्वजनिक बांधकाम विभाग मोहोळ यांच्या नियंत्रणाखाली ठेकेदारामार्फत अन्नपुरवठा केला जातो. मात्र त्याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हे क्वारंटाईन सेंटर सुरू आहे. या पूर्वी अशी घटना घडली नाही. आजची घटना समोर आल्याने संबंधित ठेकेदाराला आम्ही कारणे दाखवा नोटीस काढून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहोत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता गणेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Read More  हिंगोलीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सराफा असोसिएशनची २ ऑगस्टपासून बंदची हाक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या