प्रतिनिधी/सोलापूर
केंद्रातील मोदी सरकारने गरीब व कामगार कुटुबियांना उज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस टाक्या दिले. परंतु त्या टाक्यांचा वापर करून स्वयपाक करण्यासाठी लागणार गॅसचे दर मात्र गगणाला नेले. अशी टीका शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी करून या महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामागर सेनेच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनाश्यक वस्तुंचे भरमसाठ दरवाढ करून गरीबांना व कामगारांना जगणे मुश्कील केले आहेत. या महागाईच्या विरोधात महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
विष्णु कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने गॅस दरवाढ व जीवनाश्यक वस्तुंच्याकिंमती वाढ केल्या आहेत. म्हणून केंद्र सरकारचा जाहिर निषेध करण्यासाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दि. ११/०५/२०२२ रोजी दक्षिण सोलापूर कुंभारी येथे माँ साहेब विडी घरकुल वसाहतीत महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली महिला विडी कामगारांनी लाकडाने चुली पेटवून आणि मोदी सरकार विरूध्द भव्य निदर्शने करून निषेध नोंदविला.
सदर निषेध कार्यक्रमास अनुसरून गॅस दरवाढीच्या विरोधात निवेदन देण्यात येते की, केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून वारंवार पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनाश्यक वस्तुंच्या दरवाढ करीत आहे. त्यामुळे देशातील गरीब व कष्टकरी लोकांचे जीवन जगणे कठीण केले आहे. खर पाहता सरकार जनतेच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी काम करणे गरजेचे आहे. पण गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनाश्यक वस्तुंचे दरवाढ करून गरीबांचे हाल करीत आहे. हे अत्यंत चुकीचे व ंिनदनिय बाब आहे. म्हणून शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. डिझेल, पेट्रोल व गॅस दरवाढ त्वरीत कमी न केल्यास आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाव्दारे देण्यात येत आहे.
तरी महागाई वाढीस आमच्या विरोध व निवेदनातील मजकुर बद्दलचे अहवाल केंद्र शासनाकडे पाठवावे, असे निवेदनात नमुद करण्यात आले. सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्यासह दशरथ नंदाल, पप्पु शेख, वामनराव बावळे, प्रशांत जक्का, संजीव शेट्टी, रमेश चिलवेरी, सुर्यकांत तेली, गुरूनाथ कोळी, गणेश म्हंता, बालाजी भंडारी, राधा पवार आदि उपस्थित होते.