19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeक्राइमआईनेच केला पोटच्या गोळयाचा खुन

आईनेच केला पोटच्या गोळयाचा खुन

एकमत ऑनलाईन

बार्शी : महिन्याच्या मुलगा सारखा रडत असल्याच्या व किरकिर करत असल्याच्या त्रासाला कंटाळून आईनेच गळा दाबून मुलाचा खात्मा केल्याचा धक्कादायक प्रकार बार्शी शहरात उघडकीस आला आहे.

सार्थक स्वानंद तुपे वय अवघे ९ महीने असे मृत मुलाचे नाव असून त्याच्याच आईकडून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी संशयित मुलाची आई अश्विनी स्वानंद तुपे वय २३ वर्षे रा.वांगरवाडी अटक केली असता गुह्याची कबूली दिली की मृत बालक सारखा रडत असल्याने किरकिर करत असल्याच्या त्रासाला कंटाळून मोबाईलच्या चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला व खुनाचा आरोप स्वत:वरती येऊ नये म्हणून चोरीचा बनाव केल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अधिक माहिती अशी की मुलाचे वडील स्वानंद तुपे हे ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे बाहेरगावी होते त्यामुळे त्यांचा भाऊ आनंद राजेंद्र तुपे वय २७ वर्षे यांनी फिर्याद दि.२२ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता पुतण्या सार्थक स्वानंद तुपे याचा खून झाल्याची तक्रार दिली होती.त्यानंतर गुह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भोरे,सपोनि जायपत्रे यांनी भेट दिली आणि त्यानंतर तपासाला गती येऊन अवघ्या दोन दिवसात आरोपी शोधण्यात यश मिळाले.पुढील तपास सपोनि जायपत्रे हे करत आहेत.

जावयास विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या