24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसोलापूरसफाई कर्मचा-याच्या पोरानं बार्शीचं नाव देशभर झळकावलं

सफाई कर्मचा-याच्या पोरानं बार्शीचं नाव देशभर झळकावलं

एकमत ऑनलाईन

बार्शी : बार्शीतला तरुण दिग्दर्शक, सफाई कामगाराचा मुलगा विनोद कांबळेच्या कस्तुरीला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांचा दिल्ली येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. इंजिनियंिरग सोडून आवड जपण्यासाठी चित्रपट क्षेत्राकडे वळलेल्या विनोद कांबळेनं पुन्हा एकदा बार्शीचं नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवलं आहे.

पोस्टमार्टम करणा-या एका लहान मुलाच्या स्वप्नाची गोष्ट असलेल्या कस्तुरीचा दरवळ राष्ट्रीय स्तरावर पोहोचवला आहे. विशेष म्हणजे या कस्तुरी सिनेमानं देशासह जगभरातील काही महत्वाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. विनोदनं याआधीही केलेल्या पोस्टमार्टम या लघुचित्रपटाला देखील अनेक पुरस्कार मिळाले होते. आता कस्तुरीवर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर लागली आहे. विशेष म्हणजे कस्तुरी या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमामध्ये स्थानीक कलाकारांची संख्या जास्त आहे.

विनोद कांबळेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुरस्कारापर्यंत प्रवास केलाय. विनोद कांबळेची घरची परिस्थिती बेताची. विनोदचे वडील आजही बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यात इंजिनियंिरग सोडून त्याने चित्रपटाची आवड असल्याने मार्ग अवलंबला. विनोदनं याआधीही केलेल्या पोस्टमार्टम या लघुचित्रपटाला देखील अनेक पुरस्कार मिळाले होते. विनोदने म्होरक्या या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमासाठी देखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. शांत स्वभावाचा विनोद आपल्या शैलीत लेखन करतो. भविष्यात देखील मोठे प्रोजेक्ट त्याच्या डोक्यात आहेत. विशेष म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विनोदनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या