25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरदुस-याच दिवशी नवनियुक्त आमदाराने कोरोना विरोधातील लढ्यासाठी लावली बैठक

दुस-याच दिवशी नवनियुक्त आमदाराने कोरोना विरोधातील लढ्यासाठी लावली बैठक

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला. पण या विजयानंतर आमदार समाधान आवताडे यांनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी प्रशासकीय अधिका-यांची बैठक पंढरपूर येथे लावली आणि सर्व अधिका-यांना योग्य त्या सूचना देत आरोग्य यंत्रणेला गती देण्याचा प्रयत्न केला.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी मोठ्या सभा घेतल्या. त्यानंतर पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी आमदार समाधान आवताडे हे विजयानंतर दुस-याच दिवशी कोरोनाविरोधातील लढाईसाठी मैदानात उतरले आहेत.

कोरोना स्थितीचा आढावा समाधान आवताडे यांनी तातडीने पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या दालनात अधिका-यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदारसंघातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारकही उपस्थित होते. त्याचबरोबर कोरोना लस आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबतही माहिती घेतली. त्यानंतर आमदार आवताडे यांनी सर्व अधिका-यांना योग्य त्या सूचना देत आरोग्य यंत्रणेला गती देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उजनी धरणातील ५ टीएमसी पाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही आवताडे यांनी यावेळी सांगितले.

वादळी वा-यामुळे केळीच्या बागा आडव्या !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या