22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeसोलापूरसोलापूर ग्रामीणचा कोरोना बळींचा अकडा थांबेना

सोलापूर ग्रामीणचा कोरोना बळींचा अकडा थांबेना

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्हा प्रशासनाला जमेना ग्रामीणचा कोरोना बळींचा अकडा थांबेना आशी सदय स्थिती जिल्हयात निर्माण झाली आहे. दैनंदीन रूग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी प्रशासकीय बैठकीचा धडाका लावला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुध्दा कोरोना प्रतिबंधासाठी उपाय योजना केल्या मात्र या उपाय योजना फारशी तडीस गेली नाही. शहरी आणि ग्रामीण भागात सातत्याने लॉकडाऊन करुन ही कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात जिल्हा प्रशासनाला फारस यश प्राप्ती होताना दिसत नाही.

गुरुवारी जि.प.च्या आरोग्य विभागाने जाहीर केलेली आकडेवारी थक्क करणारी आहे.६१० नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून १३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. आत्ता पर्यंत १५ हजार ५२६ कोरोना बांधितांची नोंद झाली आहे. यातील १० हजार २१५ रुग्णांवर उपचार घरी सोडण्यात आले आहे. ४५२ जणांचा आत्ता पर्यंत मृत्यू झाला आहे. बार्शी, माढा , उत्तर सोलापुर, माळशिरस, पंढरपूर तालूक्यात कोरोना संसर्गाने थैमान केले आहे.

खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय बेरोजगार मोर्चाचे बार्शीत अर्धनग्न आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या