25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरऑक्सिजन पुरवठा करणारा एस.एस. फिलर्स प्रकल्प ठरतोय कोरोना रुग्णांसाठी वरदान

ऑक्सिजन पुरवठा करणारा एस.एस. फिलर्स प्रकल्प ठरतोय कोरोना रुग्णांसाठी वरदान

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी (गणेश चौगुले) : टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीतील एस.एस.फिलर्स हा कोविड सारख्या जीवघेण्या आजारात कोविड-१९ ची लागण झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणारा हा प्रकल्प वरदान ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र कोविड -१९ या आजाराने हजारो रुग्ण बाधित झाले असून ठिकठिकाणी रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत.संपूर्ण राज्यात व देशात ही हीच स्थिती आहे. कोविड-१९ या आजारात रुग्णावर उपचार करताना प्रामुख्याने कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे.ही ऑक्सिजनची गरज भागविताना ऑक्सिजनचे उत्पादन व मागणी यात मोठी तफावत असल्याने प्रशासनाची व मोठ-मोठ्या हॉस्पिटलची दमछाक होत आहे.एरवी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गरज लागत नाही.यामुळे कृत्रिमरित्या ऑक्सिजन पुरवठा करणारे प्रकल्प कमी आहेत.यामुळे कोविड-१९ आजारात ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा जाणवत आहे.ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही अशीच सर्वत्र उत्तरे कोविड-१९ रुग्णाच्या नातेवाईकांना ऐकावी लागतात.

टेंभुर्णीत हवेतील ऑक्सिजन फिलर्स पद्धतीने व्हेप्राईज करून वेगळा करणारा जिल्ह्यातील एकमेव व राज्यातील पाचवा प्रकल्प असून या प्रकल्पाची दररोज ५५० सिलेंडर गॅस तयार करण्याची क्षमता आहे.येथे हवेतील ऑक्सिजन वेगळा करून त्याचे १९८ डिग्री सें.मी.मायनस तापमान कमी करून त्याचे लिक्विड ऑक्सिजनमध्ये रूपांतर केले जाते व नंतर तो गॅस सिलेंडर मध्ये भरण्यात येतो. हा ऑक्सिजन हा प्रकल्प १५ कामगार चोवीस तास चालवीत आहेत.

प्रशासनाच्या आदेशाने इंडस्ट्रीयल ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून सध्या फक्त कोविड -१९ च्या रुग्णांसाठीच ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या ऑक्सिजन उत्पादनावर जिल्हाधिकारी यांचेच थेट नियंत्रण असून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. या प्रकल्पातील ऑक्सिजन वापर बार्शी, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस, माढा, परांडा, मोहोळ येथे कोविड -१९ रुग्णांवरील उपचारासाठी करण्यात येत आहे.

प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक राजाभाऊ शिंदे व अमित शिंदे यांनी बोलताना सांगितले की,१५ मार्च पासून जिल्ह्यात सर्वत्र ऑक्सिजन गॅस ची मागणी वाढली असून एप्रिल पासून तर प्रकल्प चोवीस तास सुरू ठेवण्यात आला असून इंडस्ट्रियल पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. हा प्रकल्प २०१५ मध्ये कार्यान्वित करण्यात आला असून जागा,बांधकाम,मशिनरी यासाठी पाच कोटींची गुंतवणूक केलेली आहे.एरवी गॅसची मागणी कमी असल्याने प्रकल्प तोट्यात चालतो.पाच वर्षे हा प्रकल्प तोट्यात चालविला आहे.मात्र या कोरोना काळात डॉक्टरकडून धन्यवाद मिळत असल्याने तेवढेच फक्त समाधान मिळते.यामुळे शासनाने अशा प्रकल्पाना मदत करावी अशी मागणी मुख्य संचालक राजाभाऊ शिंदे यांनी केली आहे.

‘आपला तो बाळ्या….’!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या