25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeसोलापूरपंढरीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू

पंढरीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपुरात पुराचे पाणी शनिवारी पहाटेपासून झपाट्याने पुराचे पाणी असल्याने घरात साचलेला गाळ,कचरा, भीजलेले संसारोपयोगी साहित्य साफ करण्याचे काम येथील नागरिकांनी हाती घेतले असून प्रशासनाकडून रस्त्यावरील साचलेला गाळ अनेक ठिकाणी अडकलेली मृत जनावरे काढण्याचे काम केले जात असून रोगराई पसरू नये यासाठी निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे.

राज्यासह उजनी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने पंढरपूर मध्ये महापूर आला होता.

यामुळे पंढरपूर शहरातील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. मात्र शनिवारी पहाटेपासून झपाट्याने पुराचे पाणी असल्याने पाण्यात वाहून आलेला गाळ, कचरा, भिजलेले संसार उपयोगी साहित्य साफ करण्याचे काम नागरिकांकडून केले जात असून शहरातील अनेक रस्त्यांवर पुराच्या पाण्यात वाहून आलेला गाळ, काटेरी झाडे, मोठ-मोठी लाकडांची खोडे, मृत्यू जनावरे, वैकुंठ स्मशानभूमी येथील स्वच्छता करण्याचे काम केले जात आहे. याच बरोबर पुढील काळात कोणतीही रोगराई पसरू नये यासाठी नगरपालिकेकडून निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागांचा फडणवीस करणार दौरा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या