24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरवैद्यकीय बिलापोटी रूग्णास डांबून ठेवले

वैद्यकीय बिलापोटी रूग्णास डांबून ठेवले

एकमत ऑनलाईन

सोलापूर : वैद्यकीय बिलापोटी रूग्णास रूग्णालयात डांबून ठेवण्याचा संतप्त प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. रूग्णाने स्वतःचा व्हीडीओ काढून व्हायरल केल्याने या प्रकरणास वाचा फुटली, अन्यथा रूग्णास पैश्याअभावी आणखी किती दिवस रूग्णालयात खितपत पडावे लागले असते, याचा विचार करवत नाही.

महेंद्र गायकवाड या पैठण येथील रुग्णास सोलापुरातील आधार सुपर स्पेशलिटी या रुग्णालयात महिनाभरापासून डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. जवळपास १० लाख रुपयांचे बिल न भरल्याने हॉस्पिटल प्रशासनाने असे कृत्य केले होते. संबंधित रुग्णांने बाथरूममध्ये जाऊन मोबाईलवर व्हीडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हीडीओ वाऱ्यासारखं सोशल मीडियावर वायरल झाला आणि थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचला.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी सोलापुरातील मनीष काळजे यांना माहिती दिली आणि तत्काळ महेंद्र गायकवाड या रुग्णाची सुटका करावी, असे सांगितले. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता मनीष काळजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन हॉस्पिटल प्रशासनास जाब विचारला आणि डिस्चार्ज झालेल्या रुग्णास असे वेठीस धरता येत नाही असे सांगितले. याबाबत स्थानिक प्रशासनास तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या