23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeसोलापूरगुप्तांगाला चेंडू लागून खेळाडूचा मत्यु

गुप्तांगाला चेंडू लागून खेळाडूचा मत्यु

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : तालुक्यातील तावशी येथे सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजाचा चेंडू गुप्तांगाला लागल्याने नेपतगाव येथील खेळाडूचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

क्रिकेट खेळताना गार्डस डोक्याचे हेल्मेट आदी सुरक्षेची साहित्य घालणे गरजेचे आहे. ही खबरदारी न घेतल्याने एका तरूण युवकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये तालुक्यातील नेपतगाव येथील विक्रम रमेश क्षीरसागर (३५) या खेळाडुचा मृत्यू झाला. तावशी येथे टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नेपतगाव संघाकडून विक्रम फलंदाजी करीत होता. विरोधी संघातील खेळाडूने वेगाने टाकलेला टेनिस चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला.

यावेळी त्याने गार्ड घातले नसल्याने जोरदार मुका मार लागून तो जागीच कोसळला. यावेळी त्यास उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाचा त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान विक्रम हा नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथेच वास्तव्यास होता. परंतु लॉकडाऊननंतर तो आपल्या मुळ गावी नेपतगावला आला होता. क्रिकेट खेळाची त्याला सुरूवातीपासून आवड असल्याने तो नेहमी विविध स्पर्धेत भाग घेत असे. विक्रमच्या पश्­चात आई, वडील, पत्नी, चार व अडीच वर्षाची दोन मुल आहेत. ग्रामीण भागात तसेच विविध ठिकाणी अशा अनेक क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. परंतु यासाठी आवश्यक सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या