29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसोलापूर‘रेमडेसिव्हीर’च्या तुटवड्यामुळे नातेवाईकांचे हाल

‘रेमडेसिव्हीर’च्या तुटवड्यामुळे नातेवाईकांचे हाल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहर जिल्ह्यात सद्यस्थितीत साडेनऊ हजारांहून अधिक रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यातील दहा टक्क््यांपेक्षा अधिक रुग्णांना दररोज एक रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा डोस द्यावा लागत आहे. मात्र मागील दोन दिवसांत जिल्ह्याला केवळ ९५३ इंजेक्शन मिळाले आहेत. इंजेक्शनचा तुटवडा नाही हा जिल्हाधिका-यांचा दावा आज खोटा ठरला आणि दुपारनंतर इंजेक्शन संपल्याचा अनुभव अनेकांना आला.

शहरात दररोज सरासरी तीनशे तर ग्रामीणमध्ये दररोज आठशे ते साडेआठशे रुग्ण वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे शहर-जिल्ह्यात दररोज १५ पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. उपचारासाठी विलंबाने रुग्णालयात दाखल होणा-यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांना किमान पाच ते सहा दिवस रेमडेसिव्हीरचा डोस देण्याचा आग्रह खासगी डॉक्टर धरत असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिका-यांनी एकाचवेळी पाच-सहा इंजेक्शन लिहून न देता दररोज एक, या प्रमाणात इंजेक्शनची मागणी करावी, असे आवाहन खासगी डॉक्टरांना केली.

मात्र परिस्थिती जैसे थेच आहे. ज्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत, त्याच ठिकाणी इंजेक्शन मिळेल असे वारंवार प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळची असून अनेक ठिकाणी इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव यांना विनंती करून पुरेशा प्रमाणात इंजेक्शन मिळावेत, अशी मागणी केली आहे.

रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असतानाच प्रत्यक्षात मात्र रुग्णांच्या नातेवाईकांचे रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी हाल सुरु आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेमडेसिव्हीरसाठी लांबच लांब रांग लागली होती. अनेकजणांना सकाळपासून रांगेत थांबूनदेखील दुपारपर्यंत इंजेक्शन मिळालेच नाही. रेमडेसिव्हीरचा पुरेसा साठा आहे. आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असतानाच प्रत्यक्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर दुपारी एक वाजेपर्यंत लांबच लांब रांग लागली होती.

रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिव्हीर मिळवण्यासाठी सोशल डिस्टसिंगचा नियम मोडत अफाट गर्दी केली होती. या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करत रुग्णांच्या नातेवाईकांना रांगेत उभे केले. दुपारी दीड वाजता येथील रेमडेसिव्हीरचा साठा संपल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. आता डफरीन हॉस्पिटल येथील मध्यवर्ती औषध भांडार येथून वाटप करण्यात येईल, असे सांगताच रुग्णांच्या नातेवाईकांनी डफरीन चौकाकडे धाव घेतली. जीवाची परवा न करता रुग्णांचे नातेवाईक अधिकारी सांगतील तसे सकाळपासूनच धावत होते. या ठिकाणी देखील केवळ शंभर डोस उपलब्ध असतील, असे अधिका-यांनी सांगताच सर्व नातेवाईकांनी सोशल डिस्टसिंगचा नियम धाब्यावर बसवत मध्यवर्ती औषध भांडार, डफरीन चौक येथे एकच गर्दी केली.

विलगीकरण असलेल्या नागरिकाकडून वाढतोय कोरोना आजाराचा प्रादूर्भाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या