22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसोलापूरलॉकडाउनमुळे विडी कामगारांच्या हालअपेष्टा

लॉकडाउनमुळे विडी कामगारांच्या हालअपेष्टा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : गतवर्षी कोरोना लॉकडाउनमध्ये शहरातील विडी कामगारांना दोन वेळा अ‍ॅडव्हान्स मिळाला होता, पण यंदाच्या लॉकडाउन काळात ही रक्कम मिळणार नसल्याने या कामगारांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. शहरात शासन दरबारी ४३ हजार विडी कामगारांची नोंद आहे. शहरात एकूण १५ विडी कारखादान असून त्यांच्या सुमारे दोनशे शाखा आहेत. गतवर्षी कोरोना आपत्तीच्या लॉकडाउन काळात हा उद्योग सुमारे अडीच महिने बंद होता. त्यावेळी या कामगारांचे मोठया प्रमाणात हाल झाले. कामगार संघटनांनी आर्थिक मदतीची मागणी उचलून धरल्यावर विडी उद्योग संघाने अ‍ॅडव्हान्सची तयारी दर्शवली होती. त्यानुसार गतवर्षी एप्रिल व मे महिन्यात कामगारांना प्रत्येकी एक हजारांचा अप्रतिम मिळाला होता. ही रक्कम अपुरी असली तरी त्यावर काही प्रमाणात कामगारांनी गुजराण केली. पण नंतरच्या काळात गरजा भागवण्यासाठी या कामगारांवर उधार उसनवारी, दागिने एवढेच नव्हे मंगळसुत्र गहाण ठेवून पैशाची तजवीज करण्याचा बाका प्रसंगही ओढवला होता.

गतवर्षीच्या या कटू अनुभवाच्या पार्श्वभुीमवर कामगारांना यंदाच्या लॉकडाउनमध्ये आणखीनच जास्त हालअपेष्टांना सामोरे जावे लागणार आहे. कारण आर्थिक परिस्थिती नीट नसल्याचे कारण देत विडी उद्योग संघाने अग्रिम न देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र जिल्हाधिका-यांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या बैठकीतील निर्देशानुसार त्यांनी कामगारांचा एप्रिल महिन्याचा पगार केला आहे. एप्रिल महिन्यात १५ दिवसच कामगारांना रोजगार मिळाला होता. त्याची मजूरी त्यांच्या बँक खात्यावर अदा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही मजुरी तुटपुजी असल्याने गतवर्षी प्रमाणे अग्रिम मिळावा, अशी कामगारांची अपेक्षा आहे, पण उद्योजक त्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे कामगारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गत महिन्यात १५ दिवसांसाठी लावण्यात आलेला लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर आता १५ मे नंतर लॉकडाउन उठेल की नाही याविषयी शाश्वती नाही . त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांना प्रचंड हाल अपेक्षांना सामोरे जावे लागणार आहे. शासनाने घरेलू, बांधकाम कामगार व रिक्षाचालकांना आर्थिक मदत जाहीर केली, पण विडी कामगारांच्या पदरात काहीच न टाकल्याने हा कामगार वर्ग सरकारवर नाराज आहे. दरम्यान सोलापूर विडी उद्योग संघाने जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन देऊन कोरोनाविषयक नियमांचे पालन करून कामगारांना रोजगार देण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्यास प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नाही. ही परवानगी मिळण्याची कारखानदारांना अपेक्षा आहे.

वाळु घाटावर महसूल विभागाची कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या