26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeसोलापूरविठ्ठलाला साकडे घालून आंदोलक वाहनातून पुण्याकडे रवाना

विठ्ठलाला साकडे घालून आंदोलक वाहनातून पुण्याकडे रवाना

एकमत ऑनलाईन

पंढरपूर (अपराजित सर्वगोड) : मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी पंढरीच्या पांडुरंगाला साकडे घालून नामदेव पायरीचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून स्टेशन रोड मार्गे मराठा आक्रोश दिंडी मोर्चा मार्गस्थ झाला. मोर्चामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे, महेश लांडगे, धनंजय साखळकर, किरण घाडगे, अर्जुन चव्हाण, संदीप मांडवे, दीपक वाडदेकर, संदीप मुटकुळे, शशिकांत पाटील, सागर कदम, स्वागत कदम, राम गायकवाड, नितीन शेळके आदींसह मराठा समाजाचे कार्यकर्ते सामील झाले होते. मात्र नवीन बसस्थानकासमोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने मोर्चा रोखला व मोर्चातील प्रमुख कार्यकर्त्यांना खाजगी वाहनाने पुण्याकडे रवाना केले.

पुणे येथे राज्याच्या मुख्य सचिवांसोबत आरक्षण प्रश्नी चर्चा होणार आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पंढरपूर ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सकाळपासूनच येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये आंदोलकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. नियोजित वेळेनुसार पोलिसांच्या परवानगीने काही प्रमुख आंदोलकांनी नामदेव पायरी येथे जाऊन “बा विठ्ठला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठाकरे सरकारला अशुद्धी दे” असे साकडे विठ्ठलाला घातले.

यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून स्टेशन रोड मार्गे सावरकर चौक, नवीन बसस्थानक येथे आल्यानंतर मोर्चास परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांकडून मोर्चा रोखण्यात आले. यावेळी “सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करते है” आशा सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. काही काळानंतर प्रमुख आंदोलक दहा खाजगी वाहनांमधून पोलीस बंदोबस्तात पुणे येथे राज्याच्या मुख्य सचिवांसोबत मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी रवाना झाले.

यादरम्यान आक्रोश दिंडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंढरपूरकडे येणाऱ्या सर्वच मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली होती. विठ्ठल मंदिर परिसर, प्रदिक्षणा मार्ग, चौफाळा या परिसरामध्ये संचार बंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडींग लावण्यात आले होते. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर ठीक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेट्रोच्या जागेचा व्यावसायिक उपयोग होणार होता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या