24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरखरी शिवसेना आमचीच, १७ सप्टेंबरनंतर मेगाभरती : डॉ तानाजी सावंत

खरी शिवसेना आमचीच, १७ सप्टेंबरनंतर मेगाभरती : डॉ तानाजी सावंत

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पक्षात इनकमिंग म्हणजे काय असते हे १७ सप्टेंबर नंतर सोलापूरकरांना दिसेल. १७ सप्टेंबरनंतर अनेकजण शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत अनेक पक्षांना दे धक्का देत लवकरच मेगा भरती होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

प्रियदर्शन साठे मित्रपरिवार आणि सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनतर्फे हेरिटेज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रवेश कार्यक्रमात सोमवारी रात्री ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, संयोजक प्रियदर्शन साठे, मनोज साठे, आशिष परदेशी, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक महादेव बिद्री, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विशाल कल्याणी, आशिष परदेशी, प्रविण बिराजदार, मोहसीन जमादार आदी विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना भगवे उपरणे परिधान करून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात सोलापूर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत इनकमिंग होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. २०२४ पर्यंत राज्य विकासात आघाडीवर नेण्याचा संकल्प शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने केलेला आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. शिंदे गट वगैरे काहीही अस्तित्वात नाही. खरी शिवसेना आमचीच आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही मंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
सप्टेंबर नंतर मेगा भरती होणार असल्याचे सावंत आणि जाहीर करतात एकनाथ शिंदे गटांमध्ये कोण प्रवेश करणार याबाबत चर्चा चालू आहे, कुठल्या पक्षाला धक्का बसणार कुठल्या पक्षातील नेते मंडळी जाणार याबाबत याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या