25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeसोलापूरभारतमाला योजनेतील अक्कलकोट ते सोलापूर रस्ता ८४% पूर्ण

भारतमाला योजनेतील अक्कलकोट ते सोलापूर रस्ता ८४% पूर्ण

एकमत ऑनलाईन

अक्कलकोट : अक्कलकोट ते सोलापूर या भारतमाला योजनेतून होत असलेल्या 38 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तसेच अक्कलकोट शहराजवळील बाह्यवळण रस्ता याचे एकूण काम 84 टक्के इतके पूर्ण झाले आहे. उर्वरित उड्डाण पूल तसेच इतर छोटी मोठी पुलांचे व इतर काम पूर्ण होण्यास आणखी चार ते पाच महिने लागतील, अशी माहिती ‘ग्रील’ या कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

श्री स्वामी समर्थ पुण्यनगरी अक्कलकोट हे शहर देशातील सर्वच महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी उपयुक्त ठरणारा रस्ता म्हणून या महामार्गाचे महत्व अधोरेखित आहे. अक्कलकोट पासून सोलापूर शहराशी जोडण्यासाठी 38 किलोमीटर लांबीचा चार पदरी सिमेंट रस्ता आणि कलबुर्गी आणि गाणगापूरकडे जाणारी जड वाहतूक बाहेरून जावी यासाठी सात किमीचा बाह्यवळण रस्ता बनविणे मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. तो आता अंतिम टप्यात आला असून एकूण कामाच्या 84 टक्के इतका पूर्ण झाला आहे. तर उर्वरित उड्डाण पूल व छोटे मोठे पूल बनविणे अंतिम टप्यात आहे.

याचा एकूण खर्च 807 कोटी रुपये इतका असून एकूण रस्त्याचा 38.952 किलोमीटर लांबीपैकी 33 किलोमीटर एवढा रस्ता बनवून तयार आहे. आता काही पुलाचा आणि भूसंपादन प्रक्रियेत असलेला रस्त्याच्या भागाचे काम सुरू असून येत्या पाच महिन्यात उर्वरित काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावर आणखी वेगवान व विना अडथळ्यांची दळणवळण सेवा प्रवाश्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा हा दूरदृष्टीचा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जात आहे. एन एच 150 ई या नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प हायब्रीड ऍन्युईटी मोड मधील हा प्रकल्प जी आर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी पूर्णत्वास नेत आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा तसेच विजयपूर व कलबुर्गीकडे जाण्यास खूपच आरामदायी प्रवास होणार आहे. या मार्गावर टोल उभारणी सुद्धा अंतिम टप्प्यात आली असून येत्या महिनाभरात टोल वसुली सुद्धा आरंभ होणार असल्याचे सांगितले गेले.

हा रस्ता होण्यापूर्वी जास्त गर्दीच्या काळात अरुंद रस्त्यामुळे पाणी टाकी जाण्यास सव्वा तास तर स्टँड येथे जाण्यास पावणेदोन तास वेळ लागत होता. तो आता राष्ट्रीय महामार्गाने जोडल्याने वेळ निम्यावर येणार आहे. या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित कुंभारी, वळसंग, कर्जाळ लिंबिचिंचोळी येथील उड्डाण पूल अधिक वेगाने पूर्ण करण्याची आहे. या कामासाठी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, ग्रील आणि स्वतंत्र अभियंता एस ए इन्फ्रा आदींचे सर्व अधिकारी, अभियंते, अधिकारी व कामगार वर्ग यांचा अथक परिश्रम सदर रस्ता वेळेवर पूर्ण होण्यास कारणीभूत आहे.

आता तालुक्याच्या नजरा तडवळ मार्गे टाकळी रस्त्याकडे
अक्कलकोट तालुक्यातील सर्व महामार्ग पूर्ण होत आले त्याला अपवाद आहे तडवळ मार्गे टाकळीचा प्रस्तावित महामार्गाचा. गेल्या तीन चार वर्षांपासून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, पण या प्रस्तावित मार्गावर चांगला रस्ता नाही म्हणून वाहतूक कमी आहे. म्हणून नवीन महामार्ग मंजुरी मिळत नाही. हा रस्ता झाल्यास मराठवाडा हा अक्कलकोट मार्गे कर्नाटक व गोवा जोडणारा महत्त्वाचा महामार्ग होऊ शकतो. यावर तातडीने मार्ग निघावा अशी येथील जनतेची अपेक्षा आहे.

पिक्चर अभी बाकी है…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या