23.2 C
Latur
Sunday, November 29, 2020
Home सोलापूर सांगोला ते महूद रस्त्यावर खड्डेच खड्डे

सांगोला ते महूद रस्त्यावर खड्डेच खड्डे

एकमत ऑनलाईन

चिकमहूद (वैभव काटे) : नव्याने घोषित करण्यात आलेल्या इंदापूर ते जत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी या मार्गावर सांगोला ते महूद व पुढे माळशिरस तालुक्यातील साळमुख पर्यंत अनेक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी हे खड्डे ताबडतोब बुजवून घ्यावेत,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सांगोला तालुका युवासेनेचे समन्वयक शंकर मेटकरी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
इंदापूर,अकलूज,महूद,सांगोला ते जत असा नव्याने राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. इंदापूर ते जत या राष्ट्रीय महामार्गास  965 जी असा क्रमांक ही पडलेला आहे.या घोषणेस  अनेक वर्षे होऊन गेले तरी इंदापूर ते सांगोला राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही.नव्याने मंजूर या राष्ट्रीय महामार्ग शेजारील जमिनींची,झाडांची गणना अनेक वेळा झालेली आहे.शिवाय अनेक वेळा या भागाचे सर्वेक्षण ही करण्यात आलेले आहे.तरीही संबंधित विभागाला निधीअभावी या कामाचा मुहूर्त सापडलेला नाही.
दरम्यान हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राहिला नसल्याने बांधकाम विभाग यावर कोणतेही काम करत नाही. त्यातच तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी जत ते पंढरपूर या मार्गाने होणारी जड वाहनांची वाहतूक सांगोला-अकलूज मार्गे वळवली होती. पूर्वी राज्य मार्ग असलेला हा रस्ता अरुंद व फारसा पक्का बांधकामाचा नव्हता.
या मार्गाने जड वाहतूक वळविल्याने सांगोला-अकलूज या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे वाढलेल्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन जड वाहनांची वाहतूक याच मार्गे करण्याची सक्ती मागे घेण्यात आली.असे असले तरी अनेक जड वाहने पूर्वीप्रमाणे याच मार्गाने जात आहेत.त्यामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी उचकटला आहे.महूद ते सांगोला रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र,आय.सी.यु.,ढाळेवाडी चौकी,वाकी,शिवणे तसेच महूद ते साळमुख दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे.त्याचा अंदाज न आल्याने या परिसरात अनेक अपघात घडले आहेत.या अपघातात अनेक जण जायबंदी झालेले आहेत. हे खड्डे ताबडतोब बुजवून घ्यावेत या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या वतीने तालुका समन्वयक शंकर मेटकरी यांनी नायब तहसीलदार किशोर बडवे यांना दिले आहे.यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख नवल गाडे, युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले,शिवसेना उपप्रमुख आदित्य काशीद,संतोष वसमळे, संतोष खडतरे, सागर चव्हाण, ऋषिकेश गरांडे आदी उपस्थित होते.राष्ट्रीय महामार्ग विभागाने यापूर्वी या रस्त्यांवर काही ठिकाणी काम केले होते.ते काम फारशे टिकावू नसल्याने त्या ठिकाणीसुद्धा रस्ता खराब झाला आहे.

वेळापूर ते सांगोला या 46 किलोमीटर पैकी 24 किलोमीटर लांबीच्या नूतनीकरण कामास मंजुरी मिळालेली आहे ह्यापैकी काही काम झालेले आहे या मार्गावरील उरलेले काम व खड्डे बुजवण्याचे काम पावसात करणे शक्य नसल्याने पाऊस थांबल्यानंतर करण्यात येईल. शिवाय या मार्गावरील उर्वरित नूतनीकरण कामाची मागणी करण्यात आली आहे.
– भास्कर क्षीरसागर उप अभियंता,राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभाग
या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत.अनेकजण जायबंदी झाले आहेत.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या या दुर्लक्षामुळे हे घडत असल्याने या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यापुढे दाखल करण्यात येईल.तसेच खड्डे बुजवण्याचे काम ताबडतोब न केल्यास युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-शंकर मेटकरी,युवासेना सांगोला तालुका समन्वयक

ताज्या बातम्या

बंडखोरी बोराळकर यांच्या मुळावर तर चव्हाणांच्या पथ्यावर ?

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपाला पोषक वातावरण असताना भाजपाचे रमेश पोकळे यांनी बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवली आहे. पोकळे यांची...

अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय यांना कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना मेंदूघाताचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह...

केंद्र सरकारला सत्तेची नशा

नवी दिल्ली : शेतक-यांच्या आंदोलनावरून आता राजकारणही तापू लागले आहे. केंद्र सरकारने दिलेले प्रस्ताव शेतक-यांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसेच, आपण बुराडीमध्ये आंदोलन करणार...

…आता आव्हानांना भिडा !

राजकीय चमत्कार संबोधल्या गेलेल्या देशातील एका अनपेक्षित व अकल्पित राजकीय प्रयोगाची वर्षपूर्ती झाली आहे. ‘हे होणेच अशक्य’ ते ‘टिकणे अशक्यच’ इथवरचे दावे होत असताना...

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधतात....

मतदान प्रक्रियेवर कंट्रोल रुममधून नजर

लातूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील एकुण ८८...

‘शाहू’चे तीन विद्यार्थी राज्यात प्रथमच्या यादीत

लातूर : कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये १ ते २० ऑक्टोबरदरम्यान सीबीटी पद्धतीने ३२ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी...

३५ कोरोना पॉझिटिव्ह : एकाचा मृत्यू

नांदेड : चाचण्या वाढताच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येतही वाढ होत आहे.मागील आठवड्यात बाधितांचा आलेख वाढला होता. रविवारीचा दिवस थोडासा दिलासादायक ठरला. रविवारी सायंकाळी प्राप्त...

आणखीन बातम्या

जिल्ह्यात १३८ कोरोना मुक्त, तिघांचा मृत्यू, ९३ नवे बाधित

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 270 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 177 अहवाल...

फेसबुकवर पोस्ट लिहून बार्शीत तरुणाची आत्महत्या

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात सध्या आत्महत्या हाचिंतेचा विषय बनला आहे.मागील काही दिवसांपासून तालुक्यात आत्महत्येचे सत्रच सुरु आहे.त्यातच रविवार दि.२९ नोव्हेंबर रोजी बार्शी...

वरवडे टोल नाक्याजवळ २१४ किलोचा गांजा पकडला

टेंभुर्णी : वरवडे टोल नाक्याजवळ टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्यांचे टीम व मोडंिनब येथील महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई करून अवैद्यरित्या विक्रीसाठी गांजा...

आ. भारतनाना भालके अनंतात विलीन

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्यावर शनिवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रुनयनांनी भावनाविवश...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

‘त्या’ ठरावामध्ये सीईओ स्वामी यांनी घातले लक्ष

सोलापूर : कुमठे येथील जिल्हापरिषदेची शाळा आणि क्रीडांगण भाडे तत्वावर देण्याच्या ठरावावर सीईओ दिलीप स्वामी यांनी लक्ष घातल्याने अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. सर्वसाधारण सभेत...

थकबाकी न भरल्याने माजी मंत्र्यांसह माजी आमदाराची मालमत्ता जप्त; महापालिकेची कारवाई

सोलापूर : महापालिकेची थकबाकी भरण्यासंदर्भात महापालिका आयुक्­त पी. शिवशंकर यांनी सुनावणी घेतली. त्यांच्यासाठी अभय योजनाही लागू करण्यात आली. मात्र, तरीही थकबाकी भरणा न केलेल्यांची...

उद्यापासून तीन हजार भाविकांना घेता येणार श्री विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मुखदर्शनाची व्यवस्था मंदिर समितीने केली असून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून शनिवारपासून दिवसभरात...

आमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांची तब्येत गंभीर असून ते वेंटीलेटरवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी...

महाराष्ट्राचा हक्काचा पैसा केंद्र सरकार देत नाही

बार्शी : महाराष्ट्र शासन केंद्र सरकारला ३५% टक्के जीएसटी देते,तरीही केंद्र सरकारने ७ महिन्यांपासून महाराष्ट्राला मिळणारा २८ हजार कोटींचा निधी दिला नाही.महिला व बाल...
1,350FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...