25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरकोरोनाच्या दुस-या लाटेमुळे मजूरवर्गावर उपासमारीची वेळ

कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे मजूरवर्गावर उपासमारीची वेळ

एकमत ऑनलाईन

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गरीब मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. या करोनाच्या दुस-या लाटेमुळे जनजीवन ठप्प झाले असताना त्याचा सर्वात जास्त फटका बसला आहे, तो दैनंदिन गोरगरीब मजुरी करणा-या वर्गाला. रोजंदारीवर काम करायचे आणि मिळणा-या मोबदल्यावर पोटाची खळगी भरायची.किराणा,धान्य आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी जवळ पैसा लागते. कामच नसल्यामुळे तो येईल कोठून. असा गोरगरीब मजूर वर्ग उत्तर तालुक्यात मोठ्याप्रमाणावर आहे.

पात्री डोनगाव, तेलगाव, तिर्हे, हिरज, शिवनी, पाकणी, बीबीदारफळ कोंडी, गुळवंची, अकोलेकाटी, सोमनाथ नगर, विश्वनाथ नगर या भागात कितीही पाऊस झाला तरी जानेवारी महिण्यातच पाण्याचा खात्मा होत असतो या उत्तर सोलापूर या भागांमध्ये उन्हाळ्यात नेहमीच पाण्याची टंचाई भासते. कधी सीना नदीला पाणी सोडलं जातं कधी नाही त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गचिंतेत असतो. सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी व मोल-मजुरी काम कारणा-यांची मोठी हालअपेष्टा सुरू आहे. त्यामुळे आम्हाला कोण वाली आहे का? असा सवाल हे शेतकरी व मजूर करीत आहेत.

उत्तर तालुक्यातील नोकरीच्या संधी खूप कमी आहेत. त्यात दरवर्षीचा निसर्गाचा चाललेला लहरीपणा त्यामुळे रोजंदारीवर आपली उपजिविका करणारा वर्ग वाढला आहे. उत्तर तालुक्­यात अगदी गावागावात बांधकाम करणारे छोटे मोठे कंत्राटदार तयार झाले आहेत.त्यांच्याकडे रोजंदारीवर काम करणारा मजूर वर्गही मोठा आहे.

या उत्तर तालुक्­यातील हजारो लोकांचे पोट भरणे व दैनंदिन जीवन जगविण्याचे काम हा व्यवसाय करत आहे. त्यामुळे गोरगरीबांचे पोषणकर्ते होण्याचे महान कार्य या एम आय डी सी ठेकेदार व कंत्राटदारांनी केले आहे. करोना विषाणूंचा कहर वाढल्याने सर्व जीवन ठप्प झाले आहे. इमारत बांधकामे बंद आणि काही कंपन्याही बंद पडली आहेत. ही परिणाम या रोजंदारीच्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचा कोण विचार करणार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. उत्तर तालुक्यातील सध्याची परिस्थिती रोज मोल-मजुरी करून आपली दोन वेळेची रोजी-रोटी कमावणा-या मजुर वर्गाला दुष्काळी,अवकाळी आणि यावर्षीही कोरोनाच्या दुस-या लाटेचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या