22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसोलापूरभरधाव टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडले

भरधाव टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडले

एकमत ऑनलाईन

सोलापूर : टेंभुर्णी : पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे येथील टोलनाक्याजवळ वाहन तपासणी करीत असताना मद्यधुंद कंटेनर चालकाने तपासणीसाठी थांबलेल्या सागर चोबे (वय ३३, राहणार बार्शी ) या वाहतूक पोलिस कर्मचा-यांच्या अंगावरच कंटेनर घातल्याने चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.

मयत सागर चौबे हे मोडंिनब येथील महामार्ग सुरक्षा पथकात कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना हा अपघात घडला आहे. शवविच्छेदनासाठी सागर चोबे यांचा मृतदेह टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. सागर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
हा अपघात रविवारी दुपारी 4 ते 4.30 दरम्यान वरवडे टोल नाक्याजवळ झाला. यात भरधाव टेम्पो चालकाने सागर चौबे यांना चिरडले. अपघातानंतर टेम्पो चालकाला पकडण्यात आले आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावर महामार्ग पोलिसाला आयशर टेम्पो चालकाने धडक दिली. या अपघातात सागर औदुंबर चौबे (वय-35, रा. बार्शी, नियुक्त मोडंिनब महामार्ग पोलीस पॉईंट) यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.बार्शी येथील दोघे भाऊ ग्रामीण पोलीस दलात भरती झाले होते. मृत सागर चौबे मोडंिनब पॉईंटला तर विशाल चौबे सावळेश्वर पॉईंटवर नियुक्तीस होते.

नरभक्षक बिबटयाला गोळया घालण्याची वनविभागाने मागितली परवानगी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या