18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeसोलापूरपंढरपुरातील दगडी पुल पाण्याखाली

पंढरपुरातील दगडी पुल पाण्याखाली

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. दोनच दिवसांपूर्वी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी ते पाणी चंद्रभागेच्या पात्रात दाखल झाल्याने सोमवारी दुपारी येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काही दिवसांपासून उजनी धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने उजनी धरण शंभरी टक्के झाल्याने भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोडण्यात आलेल्या ४० हजार क्युसेक पाण्यामुळे पंढरपुरातील दगडी पूल सोमवारी दुपारी पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करून नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने येथील नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या