24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसोलापूरकाळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा संशयित रेशनचा गहू पकडला

काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा संशयित रेशनचा गहू पकडला

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी : पोलिसांनी धाडसी कारवाई करून मोडनिंब येथील गोरख पांडुरंग सुर्वे या अडत दुकानातून ट्रकमध्ये भरण्यात आलेला व गोडाउनमध्ये साठवून ठेवलेला ७ लाख ६५ हजारकिंमतीचा संशयित रेशनचा गहू व १ लाख ७९ हजारकिंमतीचा गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला रेशनचा तांदूळ असा ९लाख ४४ हजारकिंमतीचा माल पकडला.

याबाबत अधिक माहिती अशी की टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पो.नि सुरेश निंबाळकर यांना दि.८ रोजी मोडनिंब येथील मार्केट यार्ड मधील गोरख पांडुरंग सुर्वे या अडत दुकानातून रेशनचा गहू व तांदूळ ट्रकमध्ये भरला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावर कारवाई करण्यासाठी सपोनि सुशील भोसले व पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही. काशीद यांचे पोलीस पथक पाठविण्यात आले.पथक सायंकाळी ६.३० वाजता घटनास्थळी पोचले, तेव्हा एम एच ४५.ए.एफ ००५४ या क्रमांकाच्या मालट्रकमध्ये गव्हाची पोती भरत असल्याचे निदर्शनास आले तसेच अडत दुकानाच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले ३ लाख ४०किंमतीच्या ३५० पोती गहू व १ लाख ७९ हजारकिंमतीचा १५० पोती तांदूळ आढळूनआला.

दरम्यान, गोडाऊनमध्ये शासकीय शिक्का असलेली रिकामी पोतीही आढळून आली. ट्रकमधील गव्हाचे वजन केले असता ते २५०८० किलो भरले त्याचीकिंमत अंदाजे ४ लाख २५ हजार एवढी आहे. असा एकूण ९ लाख ४४ हजारकिंमतीचा मालबेकायदेशीर विक्री करण्यासाठी ट्रकमध्ये भरत असताना व गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला पोलिसांना मिळूनआला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि सुशील भोसले हे करीत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या