26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूरपंढरपूरचे विठुरायाचे देऊळ उघडले; विठ्ठल भक्तांनी तब्बल सहा महिन्यानंतर घेतले विठुरायाचे दर्शन

पंढरपूरचे विठुरायाचे देऊळ उघडले; विठ्ठल भक्तांनी तब्बल सहा महिन्यानंतर घेतले विठुरायाचे दर्शन

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विठ्ठल मंदिर दुस-यांदा बंद करण्यात आले होते. परंतु कोरोनाचा संसर्ग कमी होताच घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारच्या आदेशाने विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने भाविकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवारड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे पंढरीचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर गेली सहा महिन्यांपासून बंद होते. प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्याने पंढरीचे विठ्ठल मंदिर गुरुवारी भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. विठुरायाचे दर्शन मिळणार असल्याने भाविकींनी पहाटे पासूनच मंदिर परिसरात गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे देवाची नित्य पूजा करण्यात आल्या. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर समितीच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

१० वर्षाखालील मुलांना आणि ६५ वर्षावरील तसेच गर्भवती व आजारी नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच इतर नागरिकांची आरोग्य तपासणी करून विशिष्ट अंतराने प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेत सोडण्यात येत आहे. भाविकांसाठी कासार घाटावरून दर्शना रांग सुरू करण्यात आली आहे.त्याच ठिकाणी भाविकांकडून हार-फुले काढून घेतली जात आहेत. त्याचबरोबर भाविकांच्या हातावर सॅनिटायझर व शरीरातील तापमान तपासण्याचे काम होत आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे तब्बल सहा महिन्यानंतर विठूरायाचे सावळे रूप भाविकांना पाहता आल्याने भाविकांचे आनंदाश्रू अनावर झाले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या