26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूरसंथ गतीने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले

संथ गतीने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची भाग्य वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या यशवंत जलाशयात, २०२१ च्या पावसाळ्यात, संथगतीनेका होईना पण १५ ऑक्टोबर २० रोजी नियोजित १११.२८ टक्के पाणीपातळी व १२३.२८ टीएमसी पाणीसाठा झालेला असून पुढील वर्षभर पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंदे व इतर व्यवसायासाठी पाणी कमी पडणार नाही म्हणून सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

उजनीची जून २१ मध्ये असलेली उणे -२३% पाणी पातळी अधिक ६२ %होण्यास ऑगस्ट महिना अखेर पर्यंत वेळ लागला, तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातही पावसाने खुप ओढ दिलेली होती व म्हणून ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २१ दरम्यान शेतीसाठी कालवा, बोगदा व सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले होते, व यामुळे त्यावेळी ६२.३४% वर टक्के वर पोचलेली पाणी पातळी पुन्हा ६०.०४% टक्के वर येऊन थांबली होती. अवघा एक महिना पावसाळा बाकी होता आणि पाणी पातळी ची अवस्थाचिंताजनक झाली होती परंतु सप्टेंबर अखेर व आक्­टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात कमी वेळात परंतु जास्त मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ सुरू होऊन १५ ऑक्टोबर २१ रोजी नियोजित क्षमते एवढा म्हणजेच १११. २८ टक्के पाणी पातळी व १२३.२८ टी एम सी, संथ गतीने पाणी साठा झालेला आहे. दरम्यान ऑक्टोबर २१ च्या पहिल्या आठवड्या पासून उजनीच्या वरती होणा-या पावसाचा अंदाज बघून उजनी धरणातून भीमा नदी, कालव्यातून, बोगद्यात व सिंचन योजनेतून शेतीसाठी खरिपाचे आवर्तन चालू ठेवले आहे.

उजनी धरणाच्या वरील असलेल्या एकुण १९ लहान-मोठ्या धरणापैकी वडज, ंिडबे, घोड, कळमोडी, चासकमान, भामा-आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई ,टेमघर, वरसगाव व पानशेत ही धरणे शंभर टक्के भरली आहेत तर ंिपपळगाव जोगे, मुळशी व खडकवासला ही तीन धरणे ८५ ते ९० टक्के पर्यंत भरलेले असून माणिकडोह आणि विसापूर ही दोन धरणे ६५ टक्के पर्यंत स्थिरावली आहेत. सध्या धरण नियंत्रण विभागाकडून उजनी जलाशयात १११.२३ टक्के पाणी पातळी व १२३.२८ टीएमसी पाणी साठा कायम ठेवण्यासाठी भीमा नदी, कालवा बोगदा व सिंचन योजनेद्वारे कमी प्रमाणात पाणी सोडणे चालू आहे परंतु आगामी पाच ते सहा दिवसाचे आत हेही पाणी बंद करण्यात येईल असे धरण नियंत्रण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

दरम्यान नीरा खो-यातील गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर ,चिलेवाडी व वीर ही धरणे १०० टक्के भरली आहेत व पाणी पातळी नियंत्रण ठेवण्यात एत आहे असे नीरा खोरे नियंत्रण विभागाकडून कळविण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, फलटण तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अकलूज परिसरात वीर धरणाचे पाणी सर्व क्षेत्रासाठी वापरले जाते.

नोव्हेंबर २१ मध्ये शासकीय स्तरावर कृष्णा खोरे जलसंपदा विभाग कालवा पाणी वाटप मंडळाची बैठक होऊन उजनीच्या पुढील वर्षासाठी पाणीवाटपाचे धोरण निश्चित केले जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित असतात. यावेळी सोलापूर जिल्हावासीयांना पिण्यासाठी पाणी तसेच शेतीसाठी रब्बी हंगामात व उन्हाळी हंगामासाठी पाण्याची कीती आवर्तने द्यायची याचे नियोजन ठरवण्यात येईल हे निश्चित.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या