18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeसोलापूरसिनानदी पात्रात बुडत असलेल्या दोघांचे महिलांनी वाचवले प्राण

सिनानदी पात्रात बुडत असलेल्या दोघांचे महिलांनी वाचवले प्राण

एकमत ऑनलाईन

रिधोरे : माढा तालुक्यातील राहुलनगर (सुलतानपूर) ता.माढा.गावातील सिनानदीच्या पात्रात दोघे जण बुडत असताना वेळीच प्रसंगावधानता व तत्परता दाखवत गावच्या देवदुतरुपी महिलांनीच त्यांचे प्राण वाचवलेत. राधिका राजेंद्र भोई,राणी धोंडीराम भोई अशी त्या दोन धाडसी महिलांची नावे असुन प्रितम नंदकुमार शिंदे(वय ९), दिनकर ओहोळ (वय ३८) या दोघांचे प्राण त्यांनी वाचवलेत.ही घटना गावच्या सिना नदीच्या पात्रात रविवारी साधारणपणे सकाळी १० च्या सुमारास घडली.

मुंबई येथे २६ /११ च्या दहशतवादी हल्यात हौतात्म्य पत्करलेल्या राहुल सुभाष शिंदे यांच्या नावामुळे या गावाला ओळख होती.नुकतेच या गावाचे नाव सुलतानपुर ऐवजी राहुलनगर देखील करण्यात आले आहे.गावात घडलेल्या घटनेमुळे राहुलनगर वासियांची मान अभिमानाने निश्चितच उंचावली गेली आहे.
दोन्ही महिलांच्या सतर्कतेमुळे गावावरची मोठी दुर्घटना व अनर्थ टळला.सिनानदीच्या पात्राच्या कडेला प्रितम शिंदे हा खेळत असताना त्याचा तोल गेल्याने तो नदी पात्रात बुडत असल्याची बाब परिसरात काम करित असलेल्या दिनकर ओहोळ यांना दिसताच प्रितमला वाचवण्यासाठी त्यांनी नदीत उडी घेतली.मात्र पाण्याचा व प्रवाहाचा अचुक अंदाज न आल्याने व पाणी अधिक असल्याने दोघे वाहत पुढे चालले होते.नदी पात्राच्या कडेलाच कपडे धुवत असलेल्या राधिका भोई, राणी भोई यांना आरडाओरड ऐकु येताच त्यांनी त्या दिशेने धाव घेतली.

दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहत जात असल्याचे त्यांना दिसले.तुम्ही आरडाओरड करु नका घाबरु नका .आम्ही तुम्हाला सुखरुप बाहेर काढु असा धीर देत दोघींनीही तत्परतेने नदी पात्रात उतरुन पाण्याच्या प्रवाहात जात साडीचा आधार घेत त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन पाण्याच्या बाहेर सुखरुप देखील काढले.जिवावर उदार होऊन दोघांचे प्राण वाचवलेल्या या जिजाऊ-सावित्रींच्या लेकींचे गावांसह परिसरातील गावातुन कौतुक होत असुन त्याचे धाडस वाखाणण्याजोगे असेच आहे.

राधिका राजेंद्र भोई,राणी धोंडीराम भोई दोन्ही महिलांनी प्रसंगावधान व सतकर्ता आणि दाखवलेल्या धाडसांमुळे आमच्या गावावरची मोठी दुर्घटना टळली आहे.या महिलांचे कौतुक करावे तेवढे कमीच असुन दोन्ही महिलांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देण्याचा ठराव ग्रामपंचायत मध्ये ठेवण्यात येणार असुन तो मंजुर करुन घेत शासनदरबारी पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे गावचे सरपंच रोहन हनुमंत धुमाळ यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या