31.2 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeसोलापूरदुहेरी जलवाहिनी १७० एमएलडीचे काम लवकरच सूरू होणार

दुहेरी जलवाहिनी १७० एमएलडीचे काम लवकरच सूरू होणार

एकमत ऑनलाईन

सोलापूर : दुहेरी जलवाहिनी १७० एमएलडी पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज पूर्व नियोजनासाठी पंपिंग हाऊस, जॅकवेल,उजनी येथील इंटकवेल,नवीन होणारे १७० एमएलडीचे इंटकवेल, कॉपर डॅम, नवीन होणारे १७० एमएलडीचे बी.पी.टीची जागा, एक्सप्रेस फीडर लाईन, सध्या सुरू असलेल्या खंडाळा येथील बी.पी.टीची जागा आदी ठिकाणाची पाहाणी करून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

उजनी जवळील माने गावाजवळ एमएसईबीच्या पोलवर वीज कोसल्यामुळे काल रात्री ९ वाजल्या पासून उजनी पंप हाऊस येथील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्या ठिकाणी आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पाहणी केली.अद्यापही वीज पुरवठा सुरू नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

दरम्यान, वीजपुरवठा खंडित असल्यामुळे सोलापूर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. एक दिवस पाणी पुरवठा पुढे जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी. नागरिकांना पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली झ्र उगले यांनी केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकरी अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यकटेश चौबे, उपअभियंता नीलकंठ मठपती, सहायक अभियंता संतोष यलगुलवार, अवेक्षक गणेश काकडे, इलेक्ट्रिक सुपरवायझर नितीन आंबीकर आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या