30.1 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeसोलापूरसमांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करावे

समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करावे

एकमत ऑनलाईन

सोलापूर : उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम तत्कालीन सीईओंनी शासनाच्या पूर्वसंमतीशिवाय अधिकार नसताना काम थांबवले. याचा खुलासा त्यांच्याकडून घ्यावा. सध्या मक्ता दिलेल्या संबंधित नव्या मक्तेदाराकडूनच जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नियोजन भवनात स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त शितल तेली-उगले व अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या संदर्भात पत्रकारांना अधिक माहिती देताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले, आजच्या स्मार्ट सिटीच्या आढावा बैठकीत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामासंदर्भात चर्चा झाली. उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करावे. यापूर्वीच्या सीईओ यांनी दिलेली या कामावरील स्थगिती उठवावी. सध्या मक्ता दिलेल्या नवीन ठेकेदाराकडून हे काम करून घ्यावं येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात यावा, अशा सूचना आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री विखे-पाटील यांनी यावेळी दिली..

उजनी धरणामध्ये मुबलक पाणी असूनदेखील सोलापूरकरांना पाच दिवसांआडही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे चालू झालेले काम कोणतेही कारण नसताना स्मार्ट सिटीच्या तत्कालीन सीईओंनी थांबवल होते. समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरु करा व हे काम पूर्ण होण्याकरिता कालमर्यादा निश्चित करून तसा कार्यक्रम आखण्यात यावा, अशी मागणी आ. प्रणिती शिंदे व आ. सुभाष देशमुख यांनी केली.

सोलापूर शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी समांतर जलवाहिनीची योजना कागदी घोडे चालवून विनाकारण प्रलंबित ठेवण्यात येत आहे. यामुळे शहरासाठी प्रामुख्याने महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प मागे पडत गेलेला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून फक्त टेंडर प्रक्रिया व इतर गोष्टीची कारणे सांगून या प्रकल्पाचे काम थांबवलेले आहे. यामुळे उजनी धरणामध्ये पाणी असूनही सोलापूरकरांना नियमित पाणी मिळत नसल्याची खंत आ. शिदे व आ. देशमुख यांनी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या