26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeसोलापूरतरुणाच्या डोक्यात तलवारीच्या मुठीने मारले

तरुणाच्या डोक्यात तलवारीच्या मुठीने मारले

एकमत ऑनलाईन

बार्शी : तू आजपर्यंत वाचला… असे म्हणत रस्ता अडवून पूर्व वैमनस्यातून साहिल शब्बीर शेख (वय २७, रा.) याच्या डोक्यात रविराज सावंत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तलवारीच्या मुठीने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना २८ सप्टेंबर रोजी रात्री सोलापूर रस्त्यावर यमाई मंदिराजवळ घडली. याबाबत जखमीचा मित्र विशाल विजय काळे (वय २६, रा. सोलापूर रोड, बार्शी) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. रविराज सावंत व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन महिन्यांपूर्वी गल्लीत बोलत थांबलेल्या साहिल शेख समोरुन रविराज सावंत हा मोटार सायकलची रेस करून जात होता. त्यावेळी साहिल शेख याने त्याला रेस कां करतोस म्हणताच यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी साहिल शेख याने सावंत याच्या डोक्यात मारले. याप्रकरणात साहीलवर गुन्हा दाखल झाला होता.

२८ सप्टेंबर साहिल शेख आणि त्याचे मित्र हे फिरायला निघाले होते. यावेळी पूर्ववैमनस्यातून रविराज सावंत व इतरांनी साहिल शेखवर अडवून हल्ला केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या