26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeसोलापूरटेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चोरी

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चोरी

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी (गणेश चौगुले ):- टेंभुर्णी पोलीस ठाणे पासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या बॅंक ऑफ इंडिया च्या ए.टी.एम जवळील ए. के. ऑटोमोबाईल व मनी ट्रान्सफर या दुकानाचे शटर उचकटून तीन अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ९० हजार रुपये रोख रक्कम चोरून पोबारा केला. ही गोष्ट दुकानाचे मालक किरण पाटणकर व मुलगा अनिकेत पाटणकर यांच्या लक्षात रविवारी सकाळी सहा वाजता दुकान उघडायला आल्यानंतरच आली.त्यानंतर त्यांनी सी.सी.टीव्ही फुटेज तपासले असता एक व्यक्ती दुकान समोर उभा असून दोघा चोरट्यांनी ग्रील व शटरचे कुलुप तोडून आत प्रवेश केल्याचे दिसते आहे.

टेंभुर्णी पोलीसांना आव्हान देणारी ही चोरी असून जवळच आयडीबीआय बॅंक व त्यांचे एटीएम देखील आहे. रेकाॅर्ड वरील गुन्हेगार व भुरट्या चोऱ्या करणारी यांचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लावण्याचे मोठे आव्हान टेंभुर्णी पोलिसांपुढे उभे असून ते कशाप्रकारे तपास लावतात याकडे सर्व टेंभुर्णी करांचे लक्ष लागले असून अशा अनेक भुरट्या चोऱ्या टेंभुर्णी परिसरात होत असतात त्याचाही छडा लागेल .

नुकताच सोलापूरचा पदभार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्विकारला असून त्या कडक शिस्तीच्या व अवैध धंद्याच्या कर्दनकाळ,अवैध वाळू, मुरूम वाहतूक करणाऱ्याला नक्कीच चाप लावतील. अशी सामान्य जनतेला आशा वाटते .तसेच रात्रीची गस्त वाढवून भुरटे चोर तसेच रेकाॅर्ड वरील गुन्हेगार यांच्यावर टेंभुर्णी पोलिसांनी वचक बसविणे गरजेचे आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत.

पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या