Saturday, September 23, 2023

एक लाख रूपये व दागीन्यांची चोरी

मोहोळ : बाहेरगावी गेलेल्या बहिणीच्या घरातील एक लाख रूपये रोख व सोन्याचे दागिने भावानेच चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत बहिणीने मोहोळ पोलिस ठाण्यात भावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोहोळ तालुक्यातील गोकर्णा बाळू घोडके या कुटुंबासमवेत राहत असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे घटनेच्या अगोदर एक महिन्यापासून त्यांचा भाऊ अमोल पोपट कांबळे (रा. वाळूज, ता. मोहोळ) हा राहण्यास आला होता. दि. १८ मे रोजी फिर्यादी गोकर्णा घोडके त्यांच्या नरखेड येथे राहत असलेल्या आजारी मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान गोकर्णा यांचे पती बाळू हे मोलमजुरीच्या कामाला गेले होते व त्यांचा भाऊ अमोल कांबळे हा घरात एकटाच होता. गोकर्णा घोडके यांनी जाताना कपाटामध्ये म्हैस विकून आलेली १ लाख रुपयांची रोख रक्कम व इतर सोन्याचे दागिने ठेवले होते.

दरम्यान, सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बाळू घोडके यांनी पत्नीला फोन करून सांगितले की अमोल कांबळे हा घरात दिसत नाही, त्याचे कपडे व इतर सामान दिसत नाही. तसेच घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तुटलेले आहे. त्यावेळी तत्काळ नरखेडहून गोकर्णा घोडके या औढी येथे आल्या व कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने पाहिले असता ते दिसून आले नाहीत. भाऊ अमोल पोपट कांबळे (रा. देगाव) याच्यावर संशय व्यक्त केल्यानंतर दि. २७ मे रोजी मोहोळ पोलिस ठाण्यात २ लाख ९३ हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरी प्रकरणी अमोल कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या