37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeसोलापूरश्रीपुर येथे एटीएम असून अडचण नसून खोळंबा

श्रीपुर येथे एटीएम असून अडचण नसून खोळंबा

एकमत ऑनलाईन

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस येथे बॅक ऑफ महाराष्ट्र, इण्डियन ओरसिसे बॅक, आय सी सी बॅक, पंढरपूर अर्बन बँक, टाटा ईण्डीकाॅश असे एकूण पाच ईटीयम आहेत पण कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत हे ईटीयम बंद असतात. श्रीपुर मध्ये 5 ए. टी. एम नावालाच आहेत कॅश माञ शुन्य अशी विचित्र अवस्था सध्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे ए. टी. एम असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व बॅकाचे ए. टी. एम दररोजच्या दररोज चालू ठेवणे असा आदेश सर्व बॅकांना काढला आहे ज्या बँकेचे ए. टी. एम बंद असल्यास त्या बँकेच्या मेन शाखेला दंड केला जाईल असा आदेश असताना ही त्यांच्या आदेशाला हे बॅकेचे अधिकारी व कर्मचारी केराची टोपली दाखवली जातेय. ही वस्तुस्थिती आहे.

पुर्वी ग्रामीण व शहरी भागातील लोक अडीअडचणी साठी, दवाखान्यासाठी घरांमध्ये 10ते 15 हजार रुपये ठेवत होते. परंतु सध्या संगणक युग असल्याने व ठीक ठिकाणी प्रत्येक गावोगावी एटीएमची अत्यावश्यक सुविधा असल्याने माणूस पूर्वीसारखी घरामध्ये जास्त पैसा ठेवत नाही. परंतु सध्या या भागातील ए. टी. एम ची कॅश नाही अशी बिकट अवस्था लोकांना नाईलाजास्तव गळ्यातील दागिने मोडून अडीअडचणी वा दवाखाना करावा लागत आहे. मग या ए. टी. एम चा काय फायदा ज्या ज्या वेळी ए. टी. एम मध्ये जाईल त्यावेळी नेट प्रॉब्लेम किंवा कॅश नाही अशा कारणाने सध्या श्रीपुर मधील सर्व एटीएम बंद आहेत या याकडे कोणीही गांभीर्याने बघत नाही ही वस्तुस्थिती आहे.

सध्या कोरोनासारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे व त्याची लागण झाल्यालेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे अश्या परिस्थितीत बॅकेत जाणे ग्राहकांना मुश्किल असते. सध्या बॅकाचे व्यवहार एक खिडकी योजना सारखी झाले आहे. त्यामुळे बँकेत जास्त गर्दी होऊ नये म्हणून अश्या प्रध्दतिने सध्या सर्वच बँकाचे व्यवहार सुरू आहेत त्यामुळे जास्त वेळ रांगेत उभा न राहता ताबोडतोब पैसे मिळण्यासाठी प्रत्येकजण ए. टी. एमचा आधार घेतअसतो.मात्र काही दिवसांपासून श्रीपुर मधील बऱ्याच बॅंकेच्या ए. टी. एम मध्ये कॅशच उपलब्ध नसतो. त्यामुळे ग्राहकात संताप व्यक्त केला जात आहे.

एखाद्या व्यक्तीला कोणत्याही बॅकेचे खाते ओपनिंग करताना या बॅकेचे अधिकारी व कर्मचारी मोठय़ा थाटात ए. टी एम चे महत्व व फायदे सांगुन सक्तीने ए. टी एम दिले जाते. या ए. टी. एम मुळे आपणांस कधीही कुठेही पैसे काढता येतील अशी खात्री दिली जाते. या अशेवर प्रत्येक ग्राहक ए. टी. एम बॅका कडून स्विकारतात. पण त्यांच्या या अशेवर पाणी फिरले जाते हे या बॅक अधिकारी व कर्मचारी बँक प्रशासनाला कळत नाही का. तुमच्या स्वार्थासाठी अजून किती दिवस या ग्राहकांना तुम्ही उल्लू बनवणार देव जाणे.

श्रीपुर मध्ये 5 ए. टी. एम सेंटर कार्यान्वित आहेत मात्र नेट पाॅब्लेम मुळे, कॅश नाही अश्या कारणाने सतत बंद असतात ही वस्तुस्थिती आहे. काही बॅकेत तर नावालाच ए. टी. एम आहे कॅश मात्र शुन्य ज्या ज्या वेळेला बॅंकेच्या ए. टी. एम मध्ये गाहक जातात त्या त्या वेळी ए. टी. एम बंदच आसते मग बॅकेकडून खाते काढल्यानंतर ए. टी एम घेण्याची सक्ती का केली जाते. ए. टी एम ही अत्यावश्यक सेवा नसून गाहकांना त्रास देणारी सेवा बनली आहे.

याबाबत बॅंकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कडे विचारणा केली असता सकाळी ए. टी. एम मध्ये कॅश टाकला होता आता संपला असेल अशीउडवाउडवीची उत्तरे दिली जातात यामुळे ग्राहकांना सतत हेलपाटे मारायला लागत आहे.अश्या काफील बॅक व बेफिकीर अधिकारी व कामचुकार कर्मचारी यांचेकडे बँक प्रशासन लक्ष देणार का? पाठीशी घालणार असा प्रश्न ग्राहकांतून विचारला जात आहे.

डाळी भडकल्या; दर नियंत्रणासाठी बफर स्टॉक होणार खुला

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या