सांगोला : सोलापूर जिल्ह्यातील सांगोलो येथे एका हॉटेलात पार्टी केल्यानंतर बिल दिले नसल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांचा ताफा आडवल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या हॉटेल मालकाने खोत यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
हॉटेल मालकाच्या आरोपांबाबत बोलताना खोत यांनी मी त्या मालकाला ओळखत नाही असे सांगितले आहे. हा माणूस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ते काळे झेंडे आणि निदर्शन करणार होते पण माझा ताफा लवकर आला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे त्यांचं नियोजन बारगळले, मी २०१४ पासून मी १५ वेळा सांगोल्यात आलो आहे. मी त्या माणसाला ओळखत नाही. राष्ट्रवादीकडून बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिले आहे.
दरम्यान हॉटेल मालकाविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आह, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. हा दहा वर्ष का गप्प होता असा शोध घेतला पाहीजे असेही सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तसेच आपण कोणतंही बिल थकवलं नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.