31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसोलापूरअकलुज पोलिसांवर चोरट्यांचा हल्ला, दोघे जखमी

अकलुज पोलिसांवर चोरट्यांचा हल्ला, दोघे जखमी

एकमत ऑनलाईन

अकलूज : श्रीपूर (तालुका माळशिरस) येथे रविवारी मध्यराञी २ च्या सुमारास चोरट्यांनी पोलीसांवर दगङाने हल्ला केला. यामध्ये पोलीसासह होमगर्ङ व पोलीस मिञ जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहीती अशी की, रविवारी मध्यराञी २ वाजता काही चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने श्रीपुर येथिल शिवाजी चौकात आले होते. अकलूज पोलीसांची राञी गस्त घालणारी गाङी पुढे गेल्याचे पाहताच त्यांनी तानाजी माने यांचे किराणा दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी आवाज झाल्यामुळे तेथे गस्तीवर असाणारे पोलीस कॉन्स्टेबल धनाजी झगडे, होमगार्ड सागर पवार, पोलीस मित्र अनिकेत यादव, विनोद कडलास्कर, अक्षय कुलकर्णी यांनी दुकानाकङे धाव घेतली. यावेळी त्यांनी मोठ्या धाङसाने एक चोरट्यास पकडले. आपल्या साथीदारास पकङल्याचे पाहताच चोरट्यांच्या लपुन बसलेल्या ईतर साथिदारांनी पोलीसांवरा दगङाने हल्ला चढवला. आणी आपल्या पकडलेल्या साथीदारास सोङवून पळ काढला.

सदर घटनेची माहीती मिळताच अकलुज पोलिस स्टेशनला मिळताच अकलूजचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर पोलीस चोरट्यांना शोधत होते. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल धनाजी झगडे , सागर पवार व तीन पोलीस मित्र जखमी झाले. जखमी पोलीस व पोलीस मित्र श्रीपूरच्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. डी वाय एस पी निरंजन राजगुरू व पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेस अनुसरून अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५०४/२०२० अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३२३, ३२४, ३३२, ३४, ३५३, ३८०, ४५०, ५११ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास एपीआय मारकड करीत आहेत. श्रीपूर व परिसरामध्ये छोट्या-मोठ्या चो-या होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे, रस्त्यावरती दुतर्फा अतिक्रमणे पुढे सरकत चालली आहेत. वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्रीपूर मध्ये वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी होत आहे. त्याच बरोबर श्रीपूर आऊटपोस्ट पोलीस स्टेशनला एक सक्षम पोलीस अधिकारी व स्टाफ वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

लोह्यातील शिवरायांचे स्मारक मराठवाड्यात आकर्षक ठरावे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या