27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeसोलापूरयुवकास आत्महत्येस प्रवृत्तप्रकरणी तिघे निर्दोष

युवकास आत्महत्येस प्रवृत्तप्रकरणी तिघे निर्दोष

एकमत ऑनलाईन

सोलापूर : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे ९ नोव्हेंबर २०१८ रोजी सारंग अर्जुन पवार या युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वैजीनाथ नागनाथ गवळी (रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) याच्यासह तिघांविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी अ‍ॅड. सेशन्स जज आर. डी. खेडेकर यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

९ नोव्हेंबर २०१८ रोजी मयत सारंग पवार हा गावातील विजयराज ऑर्केस्ट्रा बारमध्ये आला व त्याने दारू प्राशन करून गोंधळ केला. त्यावेळी आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे सारंग पवार याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.

मयत सारंग पवार याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सोलापूर तालुका पोलिसांनी आरोपी वैजीनाथ गवळी, संतोष कांबळे व ज्ञानेश्वर पोफळे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. यात आरोपी क्रमांक १ तर्फे अ‍ॅड. जयदीप माने, अ‍ॅड. विकास मोटे, अ‍ॅड. प्रणित जाधव, आरोपी क्रमांक २ तर्फे एस. एम. सारंगमठ व आरोपी क्रमांक ३ तर्फे अ‍ॅड. गौतम खरात, अ‍ॅड. मयूर खरात यांनी काम पाहिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या