सोलापूर : संशयावरून ४४ दिवसांच्या अमूल्या हिच्या खूनप्रकरणी वडिलांसह तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयावरून मुलीचा खून केल्याप्रकरणी पुंडलिक तिलप्पा पुजारी (वय २१), भीमाबाई तिलप्पा पुजारी ( वय ३५), विठ्ठल तिलप्पा पुजारी (वय १७, सर्व रा. शावळ, ता. अक्कलकोट) या तिघांची न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी निर्दोष मुक्तता केली.
रुक्मिणीचा विवाह पुंडलिक पुजारीसोबत झाला. त्यांना अमूल्या ही मुलगी झाली. आरोपींनी ती मुलगी आमची नाही, आम्ही तिला मारून टाकू’ अशी दमदाटी करत होते. १८ ऑगस्ट २०२० रोजी रुक्मिणी या प्रात:विधीसाठी जाऊन आल्यानंतर मुलगी अमूल्या ही उठली नसल्यामुळे तिला पाहण्यासाठी गेल्यानंतर तिचे शरीर थंड पडून व कानातून, डोळ्याच्या मधोमध जखम झालेली दिसली. त्यावरून तिने पती सासू व दीर यांचेविरुद्ध मुलीस जीवे ठार मारल्याची फिर्याद अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली होती. अॅड. मिलिंद थोबडे यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्रा धरला. आरोपींतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. दत्ता गुंड, अॅड. अमित सावळगी, अॅड. निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे अॅड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.