21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्राइमडॉक्टरच्या घरातून साडेतीन तोळे सोने चोरले

डॉक्टरच्या घरातून साडेतीन तोळे सोने चोरले

एकमत ऑनलाईन

सोलापूर: मोदीखानामधील पाच कंदील परिसरातील स्कायलाइन अपार्टमेंटमध्ये राहणा-या डॉ. मेहबूब जमादार यांचे घर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी फोडले. अवघ्या सात मिनिटात या चोरांनी कपाटात ठेवलेले जवळपास साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरले.

याबाबत डॉ. जमादार यांनी तक्रार दिली असून याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी डॉ. जमादार हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी घरातील इतर मंडळीही बाहेर गेली होती.

ही संधी साधत दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी थेट इमारतीतील दुस-या मजल्यावरील डॉ. जमादार यांच्या घराचा सुरक्षा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले जवळपास साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.

ही घटना डॉ जमादार हे घरी आल्यानंतर त्यांना कळाली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून अवघ्या सात मिनिटात चोरी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये घडलेली घटना कैद झाली. या इमारतीमध्ये इतर ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याचे नागरिकांनी सांगीतले. घटनेवेळी इमारतीमध्ये सुरक्षारक्षकही नव्हता. घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या