22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसोलापूरबार्शीत ऑक्सीजन अभावी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यु, नातेवाईकांचा आरोप

बार्शीत ऑक्सीजन अभावी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यु, नातेवाईकांचा आरोप

एकमत ऑनलाईन

बार्शी : बार्शीमधील नर्गिस मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे ऑक्सीजन संपल्याने तीन रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृतांमध्ये जनाबाई मधुकर बंडगर वय-७५वर्षे रा.सोलापूर,अश्रुबाई लक्ष्मण सांगळे वय-६५ वर्षे रा.चुंब,ता.बार्शी तर तिस-या पेशंटचे नाव माहीत नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यु होत असल्याने महाराष्ट्रासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी रेल्वेने ऑक्सीजन मागवण्यात आला होता. बार्शीलाही फलटण एमआयडीसीतून मेहता कुटुंबांनी रोज ३०० ऑक्सीजन सिलेंडर देण्याची घोषणा केली होती. तरीही अशी दुर्घटना घडलीच कशी अशी सर्वत्र चर्चा आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना रुग्णांच्या नातेवाईकांनी ऑक्सीजन संपल्यानेच त्यांचा मृत्यु झाले असल्याचे सांगितले आहे. एका रुग्णाचा ऑक्सीजन अभावी मृत्यु होतानाचा देखील व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.दरम्यान देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यु होत असल्याने महाराष्ट्रासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी रेल्वेने ऑक्सीजन मागवण्यात आला होता.

बार्शीलाही फलटण एमआयडीसी तून मेहता कुटुंबांनी रोज ३०० ऑक्सीजन सिलेंडर देण्याची घोषणा केली होती.तरीही अशी दुर्घटना घडलीच कशी अशी सर्वत्र चर्चा आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना रुग्णांच्या नातेवाईकांनी ऑक्सीजन संपल्यानेच त्यांचा मृत्यु झाले असल्याचे सांगितले आहे.एका रुग्णाचा ऑक्सीजन अभावी मृत्यु होतानाचा देखील व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. दरम्यान कॅन्सर हॉस्पिटलचे नन्हेशेठ शुक्ला यांनी माध्यमांशी बोलताना यातील पेशंट येतानाचा क्रिटिकल होते. बंडगर पेशंट तर २५ एप्रिलला अ‍ॅडमिट झाले त्यावेळीच त्यांची ऑक्सीजन लेवल कमी होती. बायपॅक मशीन लावूनही ऑक्सीजन लेवल ६० च्या वर गेली नाही. आम्ही प्रयत्न करूनही ऑक्सीजन लेवल वाढली नाही. आम्ही कमी खर्चामध्ये चांगली ट्रीटमेंट दिली असल्याचे सांगितले.

ऑक्सीजन संपला असता तर सर्व कोरोना रुग्णांना इजा पोहोचली असती.यामुळे इथे असे काही घडले नाही,दगावलेले दोन्ही कोरोना रुग्ण येतानाचा क्रिटिकल अवस्थेत होते.तिस-या पेशंटला कोरोनाबरोबर कावीळ सारखे देखील आजार होते.
किशोर परांजपे-मॅनेजमेंट ऑफिसर कॅन्सर हॉस्पिटल

झालेल्या प्रकरणाची माहिती मागवली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
-तहसीलदार-सुनील शेरखाने

आधी ऑक्सिजननिर्मिती, मगच जेवण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या