24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरकार व ट्रकच्या अपघातात नवरदेवासह तीघे ठार

कार व ट्रकच्या अपघातात नवरदेवासह तीघे ठार

एकमत ऑनलाईन

अक्कलकोट : अक्कलकोट ते गाणगापूर जाणा-या रोडवर बुधवारी रात्री पावणे अकरा वाजता शक्करपीर दर्गाजवळ कार व ट्रकच्या अपघातात होणा-या नवरदेवासह तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. लग्नाची पत्रिका देवाचरणी अर्पण करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे.

दिपक सुभाष बुचडे (वय २९, रा. मांरुजी ता. मुळशी जि. पुणे), आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय २८ वर्षे रा. हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे), आशुतोष संतोष माने (वय २३, वर्षे रा. वाघोली ता. हवेली जि पुणे ) असे मयत तीघांची नांवे आहेत.

याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. ट्रकचालक हा गाडी घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. बुधवारी (ता. 8) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास शक्करपीर दर्गाजवळ (मौजे बिंजगेर. ता अक्कलकोट) कार व ट्रकच्या धडकेत कारमधील तीन युवकांचा मृत्यू झाला.

दीपक बुचडे याच्या लग्नाची पत्रिका देवाचरणी अर्पण करण्यासाठी जात असताना होणाऱ्या नवरदेवांसह त्यांच्या दोन्ही मित्रावर काळाने घाला घातला. याची दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट येथे नोंद झाली. ट्रक ट्रेलरच्या अज्ञात चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास दिपक सुभाष बुचडे हा त्याची लग्न पत्रिका देवाचरणी अर्पण करण्यासाठी त्याचे मित्र आकाश साखरे (रा. हिंजवडी) व आशुतोष माने (रा. वाघोली) यांना सोबत घेवुन हुन्दाई कार क्रमांक (एच.एच.१४ जे एक्स ७८७८) या वाहनाने पुणे येथुन तुळजापुर मार्गे अवकलकोट ते गाणगापूरला जात होते. मौजे बिजगेंर गावाचे शिवाराजवळ आले असता शक्करपीर दर्गाजवळ ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली.

अक्कलकोट ते गाणगापुर जाणारे रोडवर समोरुन अक्कलकोटचे दिशेने येणारे ट्रक ट्रेल (आर जे १४ जीके १७२९ )चालकाने त्याचे ताब्यातील वाहन वेगाने, हयगयीने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवुन कारला समोरुन जोराची धडक दिली.

यात कारमधील तिन्ही जखमी युवकांना उपचारार्थ दाखल न करता किंवा अपघाताची खबर न देता त्यांचे मरणास तसेच दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ट्रेलर चालक वाहन जागीच सोडून पळून गेला आहे. ट्रक ट्रेलर नंबर आर जे १४ जीके १७२९ चे अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. मयताचा चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे (वय ४१ वर्षे, रा. मारुंजी ता. मुळशी जि. पुणे) यांनी फिर्याद दिली. घटना स्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, दक्षिण पोलीस स्टेशन पोनि प्रदिप काळे यांनी भेट दिली.अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदिप काळे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या