33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home सोलापूर रिक्षा-ट्रकच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू

रिक्षा-ट्रकच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर-मोहोळ मार्गावर देगाव नजीक असलेल्या गोसावीवाडी जवळ पंढरपूर कडे येणा-या रिक्षाला मालवाहतूक ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे.

पंढरपूर कडे येणा-या रिक्षाची आणि मालवाहतूक ट्रक एम एच-१३ सी.यु ५४६६ ची पंढरपूर-मोहोळ मार्गावरील देगाव नजीक असलेल्या गोसावीवाडी जवळ समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामधील रिक्षाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. रिक्षामध्ये चार जण प्रवास करीत होते.

यामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये पंढरपूर शहरातील संदीप कुमार कोळी यांच्यासह इतर दोघे जागीच ठार झाले आहेत. हे दोघे जण पंढरपूर तालुक्यातील चळे,आंबे गावातील असल्याचे समजते.

रूग्णांसह नातेवाईकांच्या चेह-यावर कृतज्ञाचे हास्य फुलले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या