22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसोलापूरइलेक्शन ड्युटीवरील शिक्षकासह कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

इलेक्शन ड्युटीवरील शिक्षकासह कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

एकमत ऑनलाईन

सांगोला : पंढरपूर विधानसभेची झालेली पोटनिवडणूक ही कोरोनाचे संक्रमण वाढवण्यासाठी पोषक ठरली. निवडणुकीनंतर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढलीय. अनेकांना यामुळे प्राण गमवावा लागला. जे या निवडणूक प्रक्रियेत सामील होते त्यांना याचा अधिक फटका बसला असून त्यांच्या संसर्गाने इतरांनाही आपले प्राण गमवावे लागत आहेत. सांगोला तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून केवळ इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकासह त्याच्या कुटुंबातील आई, वडील आणि मावशीचा मृत्यू झाला.

समजलेल्या माहितीनुसार पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेरडी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते. ड्युटीहून परत गेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. प्रमोद माने यांच्यावर सुरुवातीला सांगोला इथे उपचार करण्यात आले. मात्र तब्येत खालावल्याने त्यांच्या डॉक्टर भावाने त्यांना मुंबईला हलवले. मात्र प्रयत्नांची शिकस्त करुनही प्रमोद माने यांचे निधन झाले.

यानंतर त्यांचे वडील वसंतराव, आई शशिकला आणि मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुलाने कोरोनावर मात केली. परंतु या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणा-या प्रमोद माने यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मुलांची तुलना मुळीच नको…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या