26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूरखूनप्रकरणी तिघांना जन्मठेप तर एकास सक्तमजुरी; सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप तर एकास सक्तमजुरी; सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मुलाच्या व शेजारी राहणा-या तरुणीच्या मदतीने सासूने सुनेचा निर्घृणपणे खून केला. खुनानंतर धडावेगळे केलेले सुनेचा मृतदेह तोळणूर (ता. अक्­कलकोट) परिसरातील रेल्वे रुळावर फेकून दिले. या गुन्ह्यात मृताचा पती, सासू, शेजारीण व रिक्षाचालकाला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी दोषी धरले आहे. त्यातील मृताचा पती, सासू व शेजारणीला खूनप्रकरणी जन्मठेप तर पुरावा नष्ट केल्यामुळे पाच वर्षांची सक्­तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली तर रिक्षाचालकास पाच वर्षांची सक्­तमजुरी सुनावण्यात आली आहे.

अक्­कलकोट येथील घाडगे दूध डेअरीसमोरील संजय नगर झोपडपट्टीतील रमजान मन्नू शेखचा विवाह शहनाज हिच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी झाली होती. मात्र, रमजान, त्याची आई अम्मा ऊर्फ रेणुका मन्नू शेख, शेजारीण शाहीन रहिमान शेख यांनी पाच वर्षांच्या चिमुकलीला जीवे ठार मारून त्या परिसरातील विकास हॉटेलजवळ टाकून दिले. त्यावरून त्यांच्या घरात वारंवार भांडणे सुरू झाली. या भांडणातून रमजान, अम्मा व शाहीन या तिघांनी 2 ऑगस्ट 2018 रोजी शहनाजला जबर मारहाण केली. त्यात शहनाज जखमी होऊन बेशुद्ध पडली. मारहाणीत शहनाजचा मृत्यू झाला आणि त्यांनी शेजारील रिक्षावाला दिलदार तकदीरखॉं सौदागरला बोलावून आणले. मृत शहनाजला त्यांनी रिक्षातून अक्­कलकोट सरकारी दवाखान्यासमोरील मोकळ्या मैदानात आणले. त्या ठिकाणी आल्यानंतर शाहीनने तिचे दोन्ही पाय तर अम्माने दोन्ही हात पकडले आणि रमजानने एक्­सा ब्लेडने शहनाजचे मुंडके धडावेगळे केले. त्यानंतर त्यांनी शहनाजचा मृतदेह पोत्यात भरून रमजानच्या दुचाकीवर ठेवला आणि शाहीनच्या मदतीने त्यांनी तोळणूर येथील रेल्वे रुळ गाठला.

रेल्वे अपघात दाखविण्यासाठी त्यांनी खटाटोप केला, परंतु पोलिस तपासात सत्य समोर आले. रेल्वे गेटमन म्हाळप्पा ढोणे यांनी मृताची खबर अक्­कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यास कळविली. त्यानंतर सरकारतर्फे पोलिस हवालदार धनंिसग राठोड यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी कसून तपास केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात 17 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, आरोपींची कबुली, यावर सरकारतर्फे अ‍ॅड. प्रदीपंिसग राजपूत यांनी न्यायालयात युक्­तिवाद केला. तो ग्रा धरून न्यायालयाने चौघांना दोषी धरले असून, त्यावर आता अंतिम फैसला होणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक व्ही. एस. जाधव यांनी केला तर कोर्टपैरवी म्हणून पोलिस हवालदार डी. वाय. कोळी यांची मदत झाली. जिल्हा सरकारी वकील प्रदीपंिसग राजपूत यांनी शहनाज शेखचा निर्घृणपणे खून केल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयासमोर रास्त युक्­तिवाद मांडला. तो ग्रा धरून तिघांना जन्मठेप तर एकास पाच वर्षे सक्­तमजुरीची शिक्षा झाली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या