37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeसोलापूरतीन हजारात अंगणवाडी आयएसओ

तीन हजारात अंगणवाडी आयएसओ

एकमत ऑनलाईन

कृष्णा लावंड (अकलुज) : माळशिरस तालुक्यातील अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र देण्यासाठी पंचायत समितीच्या अधिका-यांनी अंगणवाडी सेवीकांकडून प्रत्येकी ३ हजार रूपये गोळा केले असल्याचे धकादायक प्रकार उघड झाला. अंगणवाडी आय एस ओ करण्यासाठी काही ग्रापंचायतीने पैसे भरले आहे.त्यांचे म्हणणे आहे कि आम्हाला का भुर्दंड तर काही अंगणवाडी आय एस ओ करण्यासाठी सेविकाकडून उखळले तीन हजार त्याचे म्हणणे आहे कि आम्हाला भुर्दंड का. विजयवाडी ता माळशिरस येथील सेविका मनिषा कुलकर्णी यांचे म्हणणे आहे कि मी पैसे भरले आहेत व माझी अंगणवाडी आय एस ओ झाली नाही म्हणून हा तालुक्यातील धकादायक प्रकार उघड झाला. यातील काही अंगणवाड्यांना पैसे घेऊनही प्रमाणपत्रे मिळाली नाहीत तर यातील अनेक अंगणवाड्यांची प्रमाणपत्रे आता रद्द झाल्याचे दिसते आहे.

माळशिरस तालुक्यात एकूण ६५० अंगणवाड्या आहेत. यातील अनेक अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा देण्यासाठी सन २०१७-१८ व १८-१९ साली पंचायत समितीतील प्रकल्प अधिकारी शिवाजी पाटील यांनी अंगणवाडी सेविका यांना तीन हजार रूपये जमा करण्यास सांगितले. अनेक सेविकांनी स्वत:कडील तर अनेक सेविकांनी त्या त्या गावातील ग्रामपंचायतींकडून तीन हजार रूपये घेऊन शिवाजी पाटील यांच्याकडे जमा केले. तद्नंतर शिवाजी पाटील यांनी आयएसओ सर्टिफिकेशन व बिझनेस कन्स्लटींग करणा-या सोलापूर येथील एस. व्ही. नेटवर्क सर्व्हिसेस या खाजगी कंपनीला हे काम दिले.

या कंपनीने त्यांची कन्सलटींग व सर्टिफि केशन फि घेऊन आयएसओ मानांकनाची सटिफि केटे दिली. पण आजही रक्कम जमा असतानाही अनेक अंगणवाड्यांना सदरचे सर्टिफिकेट देण्यात आलेले नाही. त्याबद्दल अनेक अंगणवाडी सेविकांनी तक्रारी केल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे परत तर केले गेलेच नाहीत. मात्र त्यांना धमकावण्यात आले आहे. मुळातच अंगणवाडी सेविका ह्या अत्यल्प मानधनावर काम करत आहेत. त्यांच्याकडून आयएसओ साठी पैसे घेण्याचे कारण काय? घेतलेल्या रकमेपैकी किती रक्कम एजन्सीला दिली? अंगणवाडी सेविकांकडून पैसे घेण्याचा पंचायत समितीतील अधिकार्यांना हक्क आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

पहिल्या वर्षी आयएसओ दर्जा मिळाल्यानंतर पुढील वर्षी हे प्रमाणपत्र रिन्यु करावे लागते. परंतु अनेक अंगणवाड्यांनी दुसर्या वर्षी ऑडीटरला आपल्या कामाची माहिती दिली नाही व रिन्युचे पैसेही भरले नाहीत. त्यामुळे त्यांचे सर्टिफि केट रद्द झाले आहे. जर आयएसओ टिकवून ठेवण्याबाबत काळजीच घ्यायची नव्हती तर आयएसओ मिळवण्याचा घाट का घातला गेला? हा ही प्रश्न आज अंगणवाडी सेविका विचारत आहेत.

माझी खाजगी संस्था
एस. व्ही. कंपनीचे ऑडीटर यांना पैसे घेण्याबाबत विचारले असता, माझी संस्था खाजगी आहे. कन्सल्टींग व सर्टिफिकेशनसाठी पैसे लागतातच. ते पैसे मला कोणी कोणाकडून घेऊन दिले याच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझी फि मिळाली तरच मी काम करणार असे सांगितले.

अंगणवाडी सुपरवाझर सौ शिवगंगा तबेलदार यांचे माफँत प्रकल्प अधिकारी शिवाजी पाटील यांनी विजयवाडी येथील , अंगणवाडी आय एस ओ करण्यासाठी माझे कडून रक्कम रु 3000 घेतलेले आहे .माझी अंगणवाडी आय एस ओ झाली नसाल्यामुळे मी पैसे परत मागत आहे.
-मनिषा कुलकर्णी
अंगणवाडी सेविका विजयवाडी

दोषी असणा-या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वा बोंबाबोंब आंदोलन करणार आहे.
-विजय काका कुलकर्णी ,अपंग जनता दल महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या