27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरसोलापूर शहरात एकाच दिवशी तीन हजार टेस्ट; १४४ पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

सोलापूर शहरात एकाच दिवशी तीन हजार टेस्ट; १४४ पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : आतापर्यंत शहरातील ३० हजाराहून अधिक व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये चार हजार ७०७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी सर्वाधिक तीन हजार ४७ व्यक्तींची रॅपिड एन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये १४४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सिद्धेश्वर पेठेतील ७२ वर्षीय पुरुष, रेल्वे लाईन परिसरातील ८२ वर्षीय तर मेरगू टॉवरजवळील सूत मिल परिसरातील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

वर्धमान नगर, रत्नमंजिरी सोसायटी, शिवगंगा नगर, सुभाष नगर, मंगल विहार अपार्टमेंट (जुळे सोलापूर) भवानी पेठ, महापालिका कॉलनी (सात रस्ता), मोदी खाना, लोधी गल्ली, लक्ष्मी मंदिराजवळ, मजरेवाडी (मजरेवाडी), संतोष नगर, शिवाजी नगर (बाळे), काडादी चाळ, मेरगू टॉवर, पापाराम नगर, संजय गांधी न्गार (विजयपूर रोड), थोबडे वस्ती (जुना देगाव नाका), विडी घरकुल (हैदराबाद रोड), शिवगंगा नगर (पारशी विहीरीमागे), मुरारजी पेठ, एन.जी. मिल चाळ, कुमठे तांडा, लक्ष्मी नगर (हत्तुरे नगर), सत्तर फूट रोड, रेवणसिद्धेश्वर नगर, बुधवार पेठ, वसंत विहारव राधाकृष्ण कॉलनी, गवळी वस्ती (दमाणी नगर), कमल शेरी अपार्टमेंट (बुधवार पेठ), नागनाथ सोसायटी (एमआयडीसी), ऋषी नगर, थोबडे वस्ती (लक्ष्मी पेठ), इंदिरा झोपडपट्टी, सिद्धेश्वर पेठ, नंदीकेश नगर (शेळगी), दत्त मंदिराजवळ (देगाव), पश्चिम मंगळवार पेठ, दक्षिण सदर बझार, हुच्चेश्वर नगर, तिरुपती कॉर्नर (मोदी), शोभा नगर, मंजुषा हौसिंग सोसायटी, राजस्व नगर, इंद्रधनु सोसायटी, अमृता नगर, इंदिरा नगर, विष्णू नगर (नई जिंदगी), लतादेवी नगर (कुमठा नाका), राम शेट्टी नगर, स्टेट बँक कॉलनी, विद्या नगर, शिंदे चौक, न्यू पाच्छा पेठ, बागवान नगर, राघवेंद्र नगर, केकडे नगर, कोटा नगर(जुना विडी घरकुल), माशाळ वस्ती (जुना पुना नाका), योगीराज महादेवी नगर, हरळय्या नगर (होटगी रोड), मड्डी वस्ती (कुमठे), शंकर नगर, आसरा हौसिंग सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुे वस्ती), रोहिदास नगर, अवंती नगर, थोबडे नगर, निलकंठेश्वर मंदिराजवळ या ठिकाणी रविवारी नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचा अहवाल महापालिकेने आज सोमवारी दिला.

Read More  अंगावर काटा आणणारा व्हिडीओ : धावत्या ट्रेनसमोरुन तरूणांनी घेतल्या नदीत उड्या

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या