Thursday, September 28, 2023

मिरवणुकीत नाचताना तिघा तरुणाला मारहाण

सोलापूर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव मिरवणुकीत नाचणाऱ्या तिघा तरुणांना दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे गावात सोमवारी रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना घडली.

वीरेंद्र प्रतापसिंह दोडताले ( वय (३२), बादशाह मोहम्मद शेख (वय २३) व अशोक पिरप्पा गायकवाड (वय २१, सर्व. रा. हिपळे, ता. द. सोलापूर) अशी मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत.

नुकतीच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शहर जिल्ह्यात साजरी करण्यात आली. सोमवारी रात्री हिपळे गावात जयंती उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत वीरेंद्र, बादशहा व अशोक हे सहभागी झाले होते. मिरवणुकीत नाचत असताना त्यांना

राजू प्रल्हाद वाघमोडे व सूरज राजू वाघमोडे यांनी विनाकारण मारहाण केली. यात त्याच्या हाताला व छातीला मार लागून वीरेंद्र जखमी झाला. बादशहा याच्या डाव्या हाताला तर पाठीला आणि पोटाला मार लागून अशोक जखमी झाला.

या घटनेनंतर घटनास्थळावर मोठी बघ्याची गर्दी झाली आहे. अनेकांनी तो वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत तिघांना मित्र धर्मराज यांनी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिघांनाही शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. या घटनेची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या