22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रआंबेडकरांचा अखेर मंदिर प्रवेश

आंबेडकरांचा अखेर मंदिर प्रवेश

एकमत ऑनलाईन

पंढरपूरात अ‍ॅड. आंबेडकर यांचे झंझावाती आंदोलन; वारक-यांचा अभुतपूर्व सहभाग

पंढरपूर : राज्यातील मंदिर, मश्चिद, बुध्दविहार, जैन मंदिर खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरात अभुतपूर्व आंदोलन करून वारक-यांसह विठ्ठल मंदिर प्रवेश केला. कोरोना आपत्ती काळामुळे गेल्या सहा महिन्यापासून मंदिरासह धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. जनभावनेचा आदर राखत प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा हाती घेतला. पंढरपूरात सोमवारी चोख पोलिस बंदोबस्तात आंदोलन करण्यात आले.

सकाळच्या सुमारास वंचित आघाडी आणि वारकरी सेनेचे कार्यकर्ते यांनी शिवाजी चौकात तोबा गर्दी केली. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. पंढरपूर शहरातील नऊ ठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी केली होती तसेच एसटी, बसेस बंद ठेवण्यात आले होते.

विठ्ठलाचे दर्शन आणि आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाप्रसंगी केला. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुले करण्यात यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मंत्रालय स्तरावर आंदोलनाची स्थितीचा अहवाल पाठविण्यात आला. आंबेडकर मंदिर प्रवेशावर ठाम असल्याची भुमिका त्यांनी शासनाकडे सादर केली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा आंबेडकरांनी दिला होता. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी आंबेडकरांची भेट घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन करण्यात यावे अशी सुचना केली. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशा दरम्यान प्रमुख वारक-यांना दर्शनासाठी मंदिरात पाठविले. दुस-या टप्प्यात प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले.

राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी सरकारनं १० दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.१० दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपूरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंर्त्यांशी बोलताना आपण त्यांना काळाराम मंदिराची आठवण करून दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.

देश पारतंर्त्यात असताना बाबासाहेब आंबेडकर यांना नाशिकमधील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला होता. त्यावेळी मंदिराची किल्ली पुजा-याच्या हाती होती. आता मंदिराची किल्ली तुमच्या हाती आहे, असं मी मुख्यमंर्त्यांना सांगितलं. मुख्यमंर्त्यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं आंबेडकर म्हणाले.
अरुण महाराज बुरघाटे, गणेश महाराज शेटे, धनंजय वंजारी, आशोक सोनोने, रेखा ठाकूर, तुकाराम महाराज भोसले, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, विकी शेंडगे, अमित भुईगळ यांनी अ‍ॅड. आंबेडकर यांच्यासह विठ्ठलाचे दर्शन घेतले.

सोलापूर शहरात ५५ तर ग्रामीण भागात ३०८ जण कोरोनाबाधीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या