31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसोलापूरभाजीमार्केट असताना भरपावसात भाजी विकण्याची वेळ

भाजीमार्केट असताना भरपावसात भाजी विकण्याची वेळ

एकमत ऑनलाईन

बार्शी : बार्शी तालुक्याच्या वैभवात भर घालणारे महात्मा फुले भाजी मंडई हे मार्केट अनेक दशकापासून उभे आहे.कोरोनाच्या काळात प्रशासनाने यावर बंदी आणली.त्यामुळे भाजीविक्रेत्यांना उघड्यावर भाजी विकण्याची वेळ आली.त्यानंतर शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरु करून बंद पडलेले जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु केले.

मात्र असे असलेतरी बार्शीच्या मुख्याधिकारी यांनी भाजी विक्री करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना भाजी मंडईत जाऊन भाजी विकण्याची परवानगी न दिल्यामुळे पाऊस आल्यानंतर त्या भाजीविक्रेत्यांचे हाल होत आहेत.त्यामुळे अनेक सामाजिक संघटना,पक्ष यांनी मुख्याधिकारी यांना याबाबत बोलूनही त्यावर अद्याप कोणतेच पाऊल न उचलेल्यामुळे मुख्याधिकारी यांच्यावर नारजीचा सुर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामध्ये तर भाजी विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना झाली,लाखो रुपयांचे नुकसान झाले,त्यांना साधी बसायला जागा मिळाली नाही.त्यामुळे मुख्याधिकारी यांनी भाजी मंडई लवकरात लवकर सुरु करून भाजी विक्रेत्यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.शिवाय भीमनगर ते आशा टॉकीज रोडवर भाजीविक्रेते रस्त्यावरच बसल्यामुळे ट्रॅफिकही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात मुख्याधिकारी दगडे-पाटील काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

नोकरदारांसाठी नवा महागाई निर्देशांक; महागाई भत्त्याची सवलत ठरवणे होणार सोपे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या