30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home सोलापूर आज ठरणार गावगाड्याचे कारभारी

आज ठरणार गावगाड्याचे कारभारी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. जवळपास ८० टक्क््यांहून जास्त मतदान झाले. ५९० ग्रामपंचायतीमध्ये एकुण १२ हजार २२५ उमेदवारांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावली होती. यातुन ५९० गाव कारभारी प्रथम सदस्य म्हणून निवडून येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात ग्रामपंचायतीवरील सत्तेसाठी अटीतटीचा सामना झाला. कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. आता विजयासाठी जीव टांगणीला लागला आहे.

जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ताकद पणाला लावली होती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच तालुक्यावरील पकड मजबूत होत असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही अटीतटीने पार पडल्या. या निवडणुकांमध्ये एकाच नेत्याच्या दोन समर्थक गटांमध्ये सामना रंगला तर अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे ग्रामपंचायत ताब्यात ठेवणा-या नेत्याच्या विरोधात सत्तांतरासाठी फिल्डींग लावली गेली. वीज, पाणी, स्वच्छता, रस्ते आदी मुद्द्यांचे मंथन झाले. राजकीय उणी-दुणीही निघाली. या बरोबरच ग्रामपंचायतीवरील सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांनी यशासाठी रणनीती राबविण्यात आली.

ग्रामीण भागात तरुण पिढी सक्रिय झाली असून या माध्यमातून प्रस्थापितांना आव्हान देण्याचा प्रयत्न या तरुण पिढीकडून होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या प्रचारार्थ विकासाच्या मुद्द्यांऐवजी राजकीय धुळवडीचे दर्शन जनतेला बघायला मिळाले. अटीतटीच्या टकरीमुळे मतमोजणीत टाक्याची टक्कर पहावयास मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मोहोळ, बार्शी, माढा, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरस या तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार रॅली काढतात. पोस्टरबाजी होते व कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात, यामुळे जिल्हाधिका-यांनी ९ तालुक्यात सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर फौजदारी कारवाई कर?ण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या पत्रानुसार जिल्हाधिका-यांनी हा निर्णय घेतला आहे. ग्रामीण हद्दीतील हॉटेल, ढाबा, पान टप-या १८ जानेवारीच्या रात्री १० वाजल्यापासून १९ जानेवारीच्या सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. मतमोजणी परिसरात शासकीय अधिकारी व कर्मचा-यांशिवाय अन्य व्यक्तींना मोबाईल वापरता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. आज निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लसीचा प्रारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या